Nandurbar News : नंदुरबार तालुक्यात तीन हजार ३३६ पात्र आदिवासी बांधवांना शबरी योजनेतून घरकुले देण्याचा मानस आहे. तसेच कामगार, मजूर बांधवांना आवश्यक असलेली गृहोपयोगी भांडी, तसेच मोफत उज्ज्वला गॅस कनेक्शनही दिले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.
नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी नाट्यमंदिरात आयोजित शबरी घरकुल योजनेचे आदेश वाटप व कामगार कल्याण मंडळाच्या गृहोपयोगी वस्तूंच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, आमदार आमश्या पाडवी, जिल्हा परिषद सदस्या राजश्री गावित, अर्चना गावित, नटावदच्या सरपंच जयश्री गावित, नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी चंद्रकांत पवार यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री डॉ. गावित म्हणाले, की या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांचे आम्ही लोकसेवक आहोत. येथील नागरिकांचे गुजरात राज्यातील स्थलांतर रोखण्यासाठी, त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी ज्या काही उपाययोजना कराव्या लागतील त्या सर्व उपाययोजना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यास कटिबद्ध आहे.
जिल्ह्यातील पेयजल, सिंचनासाठी पाणी, दळणवळण, आरोग्य संस्थांचे निर्माण आणि विस्तारीकरण त्याचबरोबर शेतीपूरक उद्योगासाठी भरीव निधी आणि उपक्रमांची तरतूद करण्यात आली आहे. जन्मापासून मनुष्याचे संपूर्ण जीवन समृद्ध करणाऱ्या योजना शासनाच्या आहेत. अलीकडे गेल्या दहा वर्षांत जीवनमान उंचावणाऱ्या योजना तळागाळातल्या माणसांसाठी केंद्र व राज्य शासनाने तयार केल्या आहेत.
या सर्व योजना जिल्ह्यात पोचविण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनमान सुधारण्याचे आवाहन या वेळी जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी केले. पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांसाठी वरदान ठरली असून, आजतागायत जिल्ह्यात अडीच लाखापेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आल्याचे खासदार डॉ. हीना गावित यांनी सांगितले
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.