Abdul Sattar : मंत्र्याने केली शेतकऱ्याच्या घराची आश्‍वासनपूर्ती 

Farmer Death : पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी मात्र दुर्गम मेळघाटातील शेतकऱ्याला दिलेला शब्द खरा करीत त्याला पक्‍के घर बांधून दिले.
Abdul Sattar
Abdul SattarAgrowon
Published on
Updated on

Amravati News : नेते, मंत्री आश्‍वासन देतात आणि नंतर त्यांचा त्यांना विसर पडतो. परंतु पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी मात्र दुर्गम मेळघाटातील शेतकऱ्याला दिलेला शब्द खरा करीत त्याला पक्‍के घर बांधून दिले. दोन शेतकऱ्यांना हे घर बांधून देण्यात आले असून त्यावर सहा ते सात लाख रुपयांचा खर्च झाल्याचे सांगितले जाते.

Abdul Sattar
Abdul Sattar : शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचे अब्दुल सत्तारांचे आदेश

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर असताना आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलींना दत्तक घेतले होते. त्यानंतर त्या कुटुंबाला त्यांनी शिवणयंत्र तसेच रोजगाराचे साधन म्हणून ९ शेळ्या व एक बोकड याप्रमाणे उपलब्ध करून दिले. अशीच काहीशी उदारता तत्कालीन कृषिमंत्री आणि विद्यमान पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनीही दाखवित एका गरजू शेतकरी कुटुंबाच्या घराचे स्वप्न पूर्ण केले.

Abdul Sattar
Abdul Sattar Latest Update : धाडप्रकरणी सत्तार यांच्यावर नाराजी

अब्दुल सत्तार कृषिमंत्री असताना त्यांनी एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमाची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी स्वतः सादराबाडी गावातील शैलेश नायडू सावलकर व अनिल धांडे यांच्या शेतावर जात त्यांचे प्रश्‍न जाणून घेतले. रात्री त्यांच्याच घरात मुक्‍कामी थांबले. पावसाळ्याचे दिवस असल्याने घराला गळती लागली. यानंतर सत्तार यांनी तेव्हाच या कुटुंबाला पक्‍के घर बांधून देण्याची घोषणा केली. वर्षभराच्या कालावधीत या घराचे काम बहुतांश झाले असून आता केवळ टाईल्स किंवा फरशी बसविणे, खिडक्‍या लावणे अशी किरकोळ कामे बाकी असल्याचे सांगण्यात आले. परिणामी मंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनाची पूर्ततादेखील होते हा सुखद अनुभव या शेतकरी कुटुंबाने घेतला.

अमरावती विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे हे या कामावर लक्ष ठेवून होते. त्यांचा पाठपुरावादेखील हे काम पूर्ण होण्यात महत्त्वाचा ठरला. मंडळ कृषी अधिकारी अरुण बेठेकर याच भागात कर्तव्य असल्याने त्यांचे सनियंत्रण या कामावर होते. तब्बल सात लाख रुपयांचा खर्च या कामावर झाल्याचे वृत्त आहे.

एक दिवस बळीराजासाठी उपक्रमाअंतर्गत तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे संबंधित शेतकऱ्यांच्या घरात मुक्‍कामी होते. त्यांनी संबंधित शेतकऱ्याच्या घराची स्थिती पाहता घर बांधून देण्याची घोषणा केली आणि हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. किरकोळ काम बाकी असून लवकरच संबंधित शेतकऱ्याचा गृहप्रवेश होईल.
- किसन मुळे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com