Healthy Honey : आरोग्यासाठी फायदेशीर जेष्ठमध

Uses of Honey : शरीरात उष्णता जास्त असेल तर बरेचदा तोंड येणे, अर्थात तोंडात अल्सर होण्याचा त्रास बऱ्याच जणांना सहन करावा लागतो. त्यासाठी आपण ज्येष्ठमधाचा वापर करू शकतो.
Honey
Honey Agrowon

कृष्णा काळे,अर्चना नवले

Honey Benefits : शरीरात उष्णता जास्त असेल तर बरेचदा तोंड येणे, अर्थात तोंडात अल्सर होण्याचा त्रास बऱ्याच जणांना सहन करावा लागतो. त्यासाठी आपण ज्येष्ठमधाचा वापर करू शकतो. ज्येष्ठमध गाळून घ्यावा किंवा ज्येष्ठमधाच्या पावडरमध्ये गाईचे तूप आणि तिळाचे तेल मिसळावे. हे मिश्रण तोंडामध्ये लावावे. यामुळे अल्सरवर नियंत्रण मिळते.

ॲसिडिटी झालेल्या व्यक्तीने ज्येष्ठमध चूर्णासह मध, आवळा पावडर आणि तूप यांचे मिश्रण करावे. या मिश्रणाचे चाटण खाल्ल्यानंतर अॅसिडिटीवर नियंत्रण मिळते.

Honey
Honey Village Scheme : मधाचे गाव तयार करण्यासाठी दहा लाख रुपये मदत

अतिसारावर ज्येष्ठमध उपयोगी ठरतो. यासाठी ज्येष्ठमध, जायफळ, डाळिंबाच्या सालीची पावडर, खडीसाखर याचा काढा करून प्यावा. यामुळे लगेच फरक जाणवले. जर काढा करायचा नसेल तर तुम्ही ज्येष्ठमधाच्या चूर्णाचे तुपाबरोबर चाटण करून खावे. याचा चांगला परिणाम दिसतो.

बरेचदा पाणी पिऊनही उचकी थांबत नाही. मग अशावेळी आपण मध चाटतो. पण तरीही उचकी थांबत नसेल तर ज्येष्ठमधाच्या चूर्णामध्ये मध मिसळून त्याचे चाटण खावे. तुम्हाला परिणाम लगेच दिसून येईल.

उलटी करताना रक्त आले तर घाबरून जाऊ नका. कधीतरी तुम्हाला जेवणातून त्रासदायक पदार्थ पोटात गेल्याने असे होण्याची शक्यता असते. अशावेळी ज्येष्ठमध पावडर आणि पांढरे चंदन हे दुधातून उगाळून त्याचे मिश्रण तयार करावे. हे चाटण तुम्ही खाल्ल्यास हा त्रास बंद होतो.

घशाची खवखव काही केल्या थांबत नाही अथवा घसा सतत दुखत असेल तर ज्येष्ठमध हा सर्वांत चांगला उपाय आहे. ज्येष्ठमध पावडर, तूप, गूळ आणि मध यांचे चाटण तयार करून दिवसभरात दोन ते तीन वेळा अगदी थोडे थोडे चाटावे. यामुळे दोन दिवसांत घशाची खवखव थांबण्यास मदत होते.

Honey
Honey Bee : मधमाश्‍यांच्या वसाहतींची रचना

तापावर आयुर्वेदिक औषध गुणकारी ठरते. तसेच ज्येष्ठमध पावडर, मनुका, मोहाचे फूल, वाळा, त्रिफळा हे सर्व समप्रमाणात मिसळून कुटून घ्यावे. रात्रभर गरम पाण्यात भिजवावे. सकाळी हे पाणी प्यावे. यामुळे त्वरित गुण मिळेल.

काही जणांना अंगावर पित्त उठण्याचा त्रास असतो. त्यावर ज्येष्ठमध हा अतिशय गुणकारी उपाय आहे.उपचारासाठी ज्येष्ठमध उगाळून दुधातून घेतले, की त्याचा लगेच परिणाम दिसतो.

बरेचदा शरीरावर झालेल्या जखमा पटकन बऱ्या होत नाहीत. उपचारासाठी ज्येष्ठमधाचा काढा तयार करावा आणि ती जखम धुवावी. ज्येष्ठमध पावडरमध्ये तूप मिसळून जखमेवर लावल्यास, जखम बरी होण्यास मदत होते.

ज्येष्ठमध चूर्ण नियमित दुधाबरोबर सेवन केलं तर मनःशांती मिळण्यास मदत मिळते. हे अतिशय शांत औषध आहे. शरीर आणि मनामध्ये थंडावा तयार करण्यासाठी उपयुक्त ठरते.

कृष्णा काळे, ८८०५९६८५३६

(लेखक अन्नप्रक्रिया तज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com