Revenue Department : महसुली कर्मचाऱ्यांच्या संपामुळे फटका

Revenue Department Employee Strike : खानदेशात सुमारे दोन हजार महसुली कर्मचारी या संपात सहभागी असून, तलाठ्यांचाही त्यात सहभाग आहे.
Revenue Department
Revenue DepartmentAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी गुरुवार (ता. १४)पासून जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे बेमुदत संप आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

खानदेशात सुमारे दोन हजार महसुली कर्मचारी या संपात सहभागी असून, तलाठ्यांचाही त्यात सहभाग आहे. परिणामी, सातबारा उतारे, फेरफार नोंदी, उत्पन्न दाखले आदींची कार्यवाही तलाठी कार्यालयांत ठप्प झाली आहे. शेतकरी, ग्रामस्थांना त्याचा फटका अधिक बसत आहे.

सुमारे अकराशे कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. संपास राजपत्रित अधिकारी महासंघ व महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना यांनीही समक्ष संपाच्यास्थळी भेट देऊन एक दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन करून पाठिंबा दिला.

Revenue Department
Revenue Department Update : शहाद्यातील दहा मंडळांमध्ये कोतवाल पदे रिक्त

मार्च २०२३ मध्ये सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी (जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी) बेमुदत संप आंदोलन छेडले होते. त्या वेळी शासनाने मध्यस्थी करून संघटना प्रतिनिधीशी चर्चा केली. त्यात प्राधान्यक्रमावर असलेली ‘जुनी पेन्शन सर्वांना मंजूर करा’ या मागणीबाबत लेखी हमी देऊन दिलासा दिला होता.

इतर प्रलंबित मागण्यांबाबत सत्वर निर्णय घेतले जातील, असेही निःसंदिग्ध आश्‍वासन शासनाने संघटनेस दिले होते. त्यामुळे शासनस्तरावरील कार्यवाही पूर्ण होण्यास वेळ मिळावा, या उद्देशाने शासनाने केलेल्या विनंतीनुसार आम्ही संप आंदोलन स्थगित केले होते.

तरी कोणत्याही मागणीसंदर्भात ठोस निर्णय अद्याप होऊ शकला नाही. संपाच्या आदल्या दिवशी राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत शासनाशी झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने शासकीय कर्मचारी-शिक्षकांचा गुरुवारपासून बेमुदत संप सुरू झाला आहे.

Revenue Department
Revenue Department : पुणे विभागातील तहसीलदारांची होणार दप्तर तपासणी

निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, उपजिल्हाधिकारी संजय, जयश्री माळी, तहसीलदार उषाराणी देवगुणे, तहसीलदार पंकज लोखंडे, तहसीलदार शीतल राजपूत, तहसीलदार राहुल सोनवणे, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, अध्यक्ष योगेश नन्नवरे, सरचिटणीस दीपक चौधरी, कार्याध्यक्ष अतुल सानप, उपाध्यक्ष किरण बाविस्कर, कोशाध्यक्ष घनश्याम सान, अतुल सानप, दीपक चौधरी, रेखा चंदनकर, जागृती पवार, वैशाली पाटील, श्रीदेवी भोपे, परवीन तडवी, पल्लवी खडके, प्राजक्ता वाघ, के. एम. पाटील, गणेश हटकर, हेमंत खैरनार, दिनेश उगले, विलास डोंगरे, विलास हरणे, नूर शेख, सुरेश महाले, कैलास महाले आदीनीं आंदोलनात सहभाग घेतला.

जळगाव जिल्ह्यात संपात सहभागी कर्मचारी

महसूल सहायक २००

अव्व्ल कारकून १९२

मंडळ अधिकारी ११०

तलाठी ४२३

शिपाई १३३

वाहनचालक २१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com