Fossil Fuel : जीवाश्म इंधनासंदर्भात ऐतिहासिक करार

Fossil Fuel Agreement : कार्बन उत्सर्जनास कारणीभूत असल्याने जीवाश्म इंधनाचा वापर कमी केल्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे.
Bio Fuel
Bio FuelAgrowon
Published on
Updated on

Carbon Emissions : दुबई (वृत्तसंस्था) : कार्बन उत्सर्जनास कारणीभूत असल्याने जीवाश्म इंधनाचा वापर कमी केल्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे. येथे सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या ‘कॉप २८’ या वार्षिक हवामान परिषदेच्या अखेरच्या सत्रात जवळपास २०० देशांनी न्याय्य पद्धतीने जीवाश्म इंधनाच्या वापरापासून दूर जाण्याच्या ‘द ग्लोबल स्टॉकटेक’ या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

गेली दोन आठवडे केलेल्या सखोल चर्चेनंतर कोणत्याही अडथळ्याशिवाय स्वीकारलेल्या या कराराचे ‘कॉप २८’ चे अध्यक्ष सुलतान अल-जाबेर यांच्या घोषणेनंतर टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. भारत व चीनच्या कोळशाचा वापर कमी न करण्याच्या ठाम निर्धारानंतर औष्णिक ऊर्जेचा वापर कमी करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसल्याच्या पार्श्वभूमीवर तो कमी करण्याचे आवाहनही या करारात करण्यात आले.

आज जाहीर केलेल्या हवामान परिषदेच्या या करारात पृथ्वीचे तापमान दीड अंश सेल्सिअसने कमी करण्याच्या धर्तीवरच हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर निर्धारित जलद, शाश्वत पावले उचलण्याची सादही घालण्यात आली आहे. पॅरिस करार आणि त्याची वेगवेगळी राष्ट्रीय परिस्थिती, मार्ग आणि दृष्टिकोन लक्षात घेऊन जगाला ही साद घातली आहे.

Bio Fuel
Bio Fuel : महानिर्मितीतर्फे जैव इंधन वापराबाबत उद्या कार्यशाळा

या करारात २०२१ च्या ग्लासगो करारापासून एक पाऊल पुढे टाकत औष्णिक ऊर्जेचा अखंडित वापर कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांना गती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. मात्र, यापूर्वीच्या कराराप्रमाणे यात नवीन औष्णिक वीज निर्मितीची परवानगी मर्यादित ठेवण्याचा उल्लेख नाही.

भारत व चीनसारख्या प्रामुख्याने कोळशावर अवलंबून असलेल्या देशांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे करारात हा उल्लेख नसल्याचे समजले जाते. त्याचप्रमाणे, श्रीमंत देश वापरत असलेल्या तेल व वायूंचाही या २१ पानी करारात उल्लेख केलेला नाही.

उद्दिष्टांसाठी आठ सूत्री योजना
या ऐतिहासिक करारात जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आठ सूत्री कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.

जीवाश्म इंधनाच्या वापरापासून दूर राहण्याबरोबरच ऊर्जा प्रणालीत शिस्तबद्ध आणि न्याय पद्धतीने २०५० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर (वातावरणातून उत्सर्जित केलेल्या आणि काढून टाकलेल्या हरितगृह वायूंमधील संतुलन) आणण्यासाठी चालू दशकात चालना देण्याचे आवाहनही केले आहे.

जागतिक तापमानवाढ दीड अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी या करारातून ठोस कृती आराखडा आखण्यात आला आहे. कार्बन उत्सर्जनाचा सामना करणारा, अनुकूलीकरणातील अंतर भरून काढणारा, जागतिक वित्तीय स्थितीची पुर्नकल्पना करणारा आणि नुकसान भरून काढणारा हा संतुलित करार आहे.
- सुलतान अल-जाबेर, अध्यक्ष, कॉप २८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com