Hingoli News: सप्टेंबर (२०२५) महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व ५ तालुक्यांतील १ लाख ५ हजार १२० शेतकऱ्यांच्या जिरायती, बागायती, फळ पिके मिळून एकूण ५५ हजार ३७२.७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६४ कोटी ६१ लाख ८२ हजार ७५० रुपये निधी अपेक्षित आहे. .यंदा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे ३ लाख २८ हजार ७८५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी, नाले, ओढे, नद्यांच्या पुरामुळे बाधित पिकांचे पंचनामे झाले असून हिंगोली जिल्ह्यातील ३६ हजार २९८ हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, तूर आदी जिरायती पिके, १६ हजार ६४२ हेक्टरवरील हळद.Pomegranate Crop Loss: अतिवृष्टीने राज्यातील डाळिंबे काळवंडली .ऊस, केळी आदी बागायती पिके तसेच २ हजार ४३२.७० हेक्टरवरील फळपिके मिळून एकूण ५५ हजार ३७२.७० हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना जिरायती पिकांच्या नुकसानीपोटी हेक्टरी ८ हजार ५०० रुपयांनुसार ३० कोटी ८५ हजार ३३ हजार रुपये, बागायती पिकांच्या नुकसानीपोटी हेक्टरी १७ हजार रुपयांनुसार २८ कोटी २९ लाख १४ हजार रुपये.फळपिकांच्या नुकसानीपोटी हेक्टरी २२ हजार ५०० रुपयांनुसार ५ कोटी ४७ लाख ३५ हजार ७५० रुपये मिळून एकूण ६४ कोटी ६१ लाख ८२ हजार ७५० रुपये निधीची गरज आहे. शासनाने निधी मंजूर केल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना २ हेक्टर मर्यादेत अनुदान दिले जाईल. अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) आवश्यक आहे. तलाठ्याकडून विशिष्ट क्रमांक मिळाल्यानंतर ई-केवायसी रक्कम थेट बँक खात्यावर जमा केली जाईल, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले. .Crop Loss Crisis : शिवारांची दुर्दशा, दोन पैशांची मावळली आशा .हिंगोली जिल्हा सप्टेंबर २०२५ अतिवृष्टी अपेक्षित निधी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)तालुका बाधित शेतकरी बाधित क्षेत्र अपेक्षित निधीहिंगोली १६०९३ १५००७ १३ कोटी ७ लाख ८१ हजार रुपयेकळमनुरी १०९७५ १०१९४ ११ कोटी ५८ लाख ५३ हजार ५०० रुपयेवसमत ६५५४३ १९३८३ ३० कोटी ११ लाख ८५ हजार ५०० रुपयेऔंढा नागनाथ १२४३० १०७३३ ९ कोटी ७१ लाख २७ हजार ५०० रुपयेसेनगाव ७९ ५४.९० १२ लाख ३५ हजार २५० रुपये.जून ते सप्टेंबर ९६.९२ टक्के पिकांचे नुकसानहिंगोली जिल्ह्यात यंदा खरिपाची ३ लाख ३९ हजार २०४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीतील अतिवृष्टीमुळे ४ लाख १३ हजार ५९१ शेतकऱ्यांच्या ३ लाख २८ हजार ७८५.७० हेक्टरवरील पिकांचे म्हणजेच पेरणीपैकी ९६.९२ टक्के क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. जून ते ऑगस्टमधील पीक नुकसानीपोटी ३ लाख ८ हजार ४७१ शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी २३५ कोटी ६ लाख रुपयांवर निधी वाटपाची प्रक्रिया सुरू असल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.