Maharashtra farmer loan : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२६) खरीप हंगामासाठी विविध बँकांना ९२६ कोटी १३ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी शुक्रवार (ता. १७) अखेर २६ हजार ७४२ शेतकऱ्यांना २३१ कोटी ६६ लाख रुपयांचे पीककर्ज वितरित करण्यात आले असून, २५.०१ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे..यंदाच्या खरीप हंगामात हिंगोली जिल्ह्यातील १६ बँकांच्या ११२ शाखांना पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शुक्रवार (ता. १७) पर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांनी ३८५ कोटी ८९ लाख रुपयांच्या उद्दिष्टापैकी ८ हजार ९५१ शेतकऱ्यांना १०८ कोटी ९० लाख १६ हजार रुपये (२८.२२ टक्के) पीककर्ज वितरित केले..Crop Loan: कर्जमाफीच्या गर्तेत अडकले पीककर्ज वितरण.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १९८ कोटी १० लाख रुपयांच्या उद्दिष्टापैकी ११ हजार ९३३ शेतकऱ्यांना ५० कोटी ९३ लाख रुपये (२५.७३ टक्के) पीककर्ज दिले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २७५ कोटी ६० लाख रुपयांच्या उद्दिष्टापैकी ४ हजार ६९९ शेतकऱ्यांना ५२ कोटी ३१ लाख रुपये (१८.९८ टक्के) वितरित केले..Hingoli Crop Loan Disbursement: हिंगोलीत पीककर्ज वाटप केवळ १०.०३ टक्के.तर खाजगी बँकांनी ६६ कोटी ५४ लाख रुपयांच्या उद्दिष्टापैकी १ हजार १७९ शेतकऱ्यांना १९ कोटी ४६ लाख ५७ हजार रुपये (२९.२५ टक्के) पीककर्जाचे वितरण केले..हिंगोली जिल्हा खरिप २०२६ पीककर्ज वाटप स्थिती (कोटी रुपये)बँक उद्दिष्ट वाटप रक्कम टक्केवारी शेतकरी संख्याभारतीय स्टेट बँक २५३.६५ ७२.७१ २८.६७ ५८३०जिल्हा सहकारी बँक १९८.१० ५०.९८ २५.७३ ११९३३महाराष्ट्र ग्रामीण बँक २७५.६० ५२.३१ १८.९८ ४६९९बँक ऑफ बडोदा ७.६३ ४.२६ ५५.८३ ४०८बँक ऑफ इंडिया ४५.९७ ७.०८ १५.४१ ४८७बँक ऑफ महाराष्ट्रा १७.६९ ७.३२ ४१.४१ ६६०कॅनरा बँक २३.०२ ५.०२ २१.८३ ३६८सेंट्रल बँक ऑफ इंडिया ५.८१ २.७२ १५.४१ ३४८इंडियन बँक १०.७८ १.२१ ११.११ १२१पंजाब नॅशनल बँक ७.६४ ३.१४ ४१.१६ १६२युको बँक २.१७ ०.९२ ४२.८५ ८७युनियन बँक ऑफ इंडिया ११.५३ ४.४८ ३८.९० ४६०अॅक्सिस बँक ३.८२ १.३४ ३५.२१ ५२डिसीबी बँक ३.५६ .०.१२ ३.३८ १०एचडीएफसी बँक २९.०४ ८.२० २८.२४ ६४५आयसीआयसीआय बँक २५.७० ६.५७ २५.५६ १५२आयडीबीआय बँक ४.४२ ३.२३ ७३.०८ ३२०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.