डॉ.अक्षता रेणुशे, डॉ.आयुषी चौरासिया नव्याने व्यायलेल्या किंवा गाभण काळाच्या शेवटच्या टप्यात असणाऱ्या म्हशींमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात थीलायटीस आजार दिसतो. प्राथमिक निदान हे आजारांच्या लक्षणावरून करता येते. दुधाचा रंग, चव, स्थिरता, पीएच टेस्ट आणि कॅलिफोर्निया मसस्टायटिस टेस्टवरून अचूक निदान करता येते. .थीलायटीस आजार म्हणजेच अचानक कासेच्या एका किंवा अनेक सडांना सूज येते. सड मोठे आणि कठीण होतात. बाधित सडातून दूध कमी येते. हा आजार जास्त दूध देणाऱ्या म्हशींमध्ये दिसून येतो. ऑक्टोबर ते डिसेंबर या प्रजननाच्या काळात आजाराची लक्षणे दिसून येतात. दुधाळ जनावरांमधील दूध उत्पादन क्षमता कमी करणारा हा एक प्रमुख आजार आहे. वेळीच निदान केले नाही तर बाधित म्हशींचे दूध उत्पादन घटते, उपचारावर मोठा खर्च होतो. बाधित सडातून कायमचे दूध उत्पादन बंद होते..Dairy Farming: गाई, म्हशींच्या प्रसूती काळातील व्यवस्थापन.लक्षणेअचानकपणे सड लाल, गरम, मोठी आणि कठीण होते.शरीराचे तापमान सर्वसाधारण असते, बाधित सडातून दूध उत्पादन घटते, म्हैस धार काढते वेळेस बाधित सडास हात लावल्यास लाथ मारते.पूर्ण धार न काढल्यामुळे विविध जंतू तेथे वाढतात, कासदाह होतो..निदाननव्याने व्यायलेल्या किंवा गाभण काळाच्या शेवटच्या टप्यात असणाऱ्या म्हशींमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात आजार दिसतो.प्राथमिक निदान हे आजारांच्या लक्षणावरून करता येते. दुधाचा रंग, चव, स्थिरता, तसेच पीएच टेस्ट आणि कॅलिफोर्निया मसस्टायटिस टेस्टवरून अचूक निदान करता येते.बाधित सडातील दुधाची ॲन्टिबायोटिक सेन्सिटिव्हीटी टेस्ट केल्यास जंतू संसर्गाचे अचूक निदान करून वेळीच कमी खर्चात औषधोपचार करता येतो..Dairy Farming: शेती,पशुपालनातून मेळघाट सक्षमतेकडे....औषधोपचारआजाराचे तात्काळ निदान करून पशुवैद्यकाकडून योग्य उपचार करावेत.कमी झालेली दूध उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी जीवनसत्त्व अ, डी३, इ, ब, तसेच कॅल्शिअम, फॉस्फरस, झिंक व सेलेनियम असलेले टॉनिक शिफारशीनुसार द्यावे..प्रतिबंधात्मक उपाययोजनाचांगली दूधउत्पादन क्षमता असलेल्या म्हशींना संतुलित आहार, खनिज मिश्रणाचा पुरवठा करावा.दुधाळ जनावरांचा गोठा नियमित स्वच्छ ठेवावा, गोठ्यात पुरेसा सूर्यप्रकाश, खेळती हवा असावी. कीटकांच्या नियंत्रणासाठी गोठ्यामध्ये दररोज कडूलिंबाच्या पानांचा धूर करावा.धार काढते वेळेस, हात स्वच्छ धुवावेत. कास आणि सड पोटॅशिअम परमॅंगनेटच्या द्रावणाने धुवावेत.निरोगी म्हशींची धार आधी काढावी. शेवटी बाधित म्हशींची धार काढावी. बाधित कासेतील धार सर्वात शेवटी काढून त्यातील दूध वेगळे ठेवावे.-डॉ.अक्षता रेणुशे, ९७६५६६८५७९(पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखानाश्रेणी १- शिरढोण, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.