Cotton Farming: सघन लागवड तंत्रासह काटेकोर व्यवस्थापन
Cotton Crop Management: पिंपरी देशमुख (जि. परभणी) येथील सचिन देशमुख हे अभ्यासूवृत्तीचे व प्रयोगशील शेतकरी आहेत. कपाशी शेतीत त्यांचा चांगला हातखंडा आहे. सघन पद्धतीचे तंत्र, लागवडीच्या अंतरांचे प्रयोग व योग्य व्यवस्थापनातून त्यांनी एकरी १५ क्विंटलच्या आसपास व काही प्रयोगात त्याहून अधिक उत्पादकता साध्य केली आहे.