Parbhani News: राज्यात सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी जिल्हानिहाय हेक्टरी मर्यादा जाहीर केली आहे. हेक्टरी मर्यादेत शेतकरी लागवड असेल त्या प्रमाणात सोयाबीन विकू शकतात. यंदा जळगाव, अहिल्यानगर, परभणी आणि नागपूर जिल्ह्यांतील खरेदीची मर्यादा कमी करण्यात आली आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये वाढविण्यात आली आहे. .राज्यात हमीभावाने सोयाबीन खरेदी १५ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) हमीभावाने खरेदी करणार आहे. या दोन संस्थांसाठी पणन मंडळ, मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशन या संस्था खरेदी करणार आहेत. हमीभावाने खरेदीसाठी हेक्टरी मर्यादा ठरविली जाते. कृषी विभागाने दिलेल्या उत्पादकतेच्या आधारे खरेदीची मर्यादा जाहीर करण्यात आली..Soybean Procurement: बीड जिल्ह्यातील २३ केंद्रांवर होणार सोयाबीनची खरेदी.कोल्हापूर जिल्ह्याची हेक्टरी मर्यादा सर्वाधिक २४.५० क्विंटल, तर सर्वांत कमी मर्यादा गडचिरोली जिल्ह्याची ७.२१ क्विंटल आहे. सरकारे जाहीर केलेल्या हेक्टरी मर्यादेत शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी केली जाणार आहे. खरेदी करताना हेक्टरी खरेदीची मर्यादा आहे. पण जेवढ्या हेक्टरवर पिकाची पेरणी केली असेल आणि त्याची सातबारावर नोंद असेल तेवढे हेक्टरी मर्यादेप्रमाणे खरेदी केले जाईल..उदा. जालना जिल्ह्यात खरेदीची मर्यादा १५ क्विंटल आहे आणि एखाद्या शेतकऱ्याने एका हेक्टरवर पेरणी केली असेल, तर त्या शेतकऱ्याचे १५ क्विंटल सोयाबीन खरेदी केले जाईल..Soybean Procurement: कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी तीन केंद्रे.जिल्हानिहाय खरेदीची मर्यादा (हेक्टरी/क्विंटलमध्ये)जिल्हा खरेदीची मर्यादाछत्रपती संभाजीनगर ११.७०जालना १५.००परभणी १३.३०हिंगोली १४.००नांदेड .१३.५०लातूर २०.१०.धाराशिव १७.००बीड .१७.५०बुलडाणा १५.१०अकोला १४.५०अमरावती १७.१०यवतमाळ १४.३०वर्धा १५.५२.नागपूर ७.५०भंडारा १०.७५चंद्रपूर १५.००गडचिरोली ७.२१नाशिक १५.००धुळे १६.५०.नंदुरबार १२.४७जळगाव १७.००अहिल्यानगर १४.५०पुणे .२३.५०सोलापूर १५.००सातारा २२.००सांगली २३.३५कोल्हापूर २४.५०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.