Solapur News : दक्षिण सोलापूर तालुक्यात यंदा रोजच संततधार पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली खरीप पिके वाया गेली आहेत. पण पर्जन्यमापक यंत्रावर विसंबून असलेल्या महसूल व कृषी विभागाकडून आतापर्यंत फक्त नदीकाठी पुराने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आले असून, इतर क्षेत्रासाठी या विभागांकडून, तालुक्यात कमी पाऊस असल्याने पंचनामे करता येणार नसल्याचे सांगितले जात आहे..तालुक्यातील सर्व मंडलांमध्ये यावर्षी मागील वर्षापेक्षा जास्त पाऊस होऊन खरिपाच्या पिकांसोबत फळबाग आणि फुलशेतीलाही याचा मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील फक्त बोरामणी आणि मुस्ती या मंडलांसाठी पंचनाम्याचे आदेश देण्यात आले असून, इतर मंडलांतील शेतकरी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता वरिष्ठांकडून आदेश नसल्याचे सांगितले जाते..Crop Damage Survey : सोलापूर जिल्ह्यात ६० टक्के पिकांचे पंचनामे पूर्ण.याउलट वरिष्ठ कार्यालयात जाऊन पंचनाम्याची मागणी केली असता, कमी पाऊस झाल्यामुळे निकषात बसत नसल्यामुळे पंचनामे करता येत नाही, असे सांगण्यात आले. यामुळे पर्जन्यमापक यंत्रावर विसंबून राहणारा कृषी आणि महसूल विभाग मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केल्याशिवाय पिकांचे किती नुकसान झाले आहे,.Crop Damage Survey : बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करा.हे त्यांच्या लक्षात येणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे दक्षिणमधील ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे खरोखरच नुकसान झाले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे त्वरित करून भरीव मदत देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.