Maharashtra Crop Loss: महाराष्ट्रात पावसामुळे १० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; नांदेडला अतिवृष्टीग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करण्याची मागणी
Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाने २९ जिल्ह्यांतील तब्बल १० लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान केले असून नांदेड, वाशीम, धाराशिव आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. शेतकऱ्यांना पंचनाम्याशिवाय तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.