Jalna News: गेल्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे घनसावंगी तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे सरकारने तातडीने मदतीची घोषणा केली. तसेच प्रशासनाकडून पंचनामेही पूर्ण झाले. मात्र, अनेक महिने उलटूनही अद्याप हजारो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रकम जमा झालेली नाही. यामुळे बळिराजा पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. .नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदान याद्या अपलोड करण्याचे काम तहसीलदार यांच्या लॉगीनवरून होते; परंतु त्याला मंजुरी देण्याचे काम उपविभागीय अधिकारी करतात. त्यानंतर पुनर्वसन विभागाकडून डीबीटीअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले जातात. वर्ष २०२४ मध्ये ज्या शेतकऱ्यांचे पन्नास हजार रुपयांच्यावर अनुदान प्रलंबित आहे, त्याची पुनर्तपासणी होऊनही तहसीलदाराच्या.Crop damage Compensation: सर्व्हर बंद असल्याने अतिवृष्टीचे अनुदान रखडले.लॅगीनवरून मंजुरी दिली नाही. ३१०० शेतकऱ्यांना व्ही. के. नंबर दिला तरी त्यांनी केवायसी केली नाही. सामायिक क्षेत्र असल्याने संमतीपत्र दिले नाही. केवायसी केली; परंतु स्टेटसला चेक केले असता तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असे सांगण्यात येते. २०२३ मध्ये दुबार रक्कम भरणा केली. मात्र, २०२४ मधील अनुदान देण्यात आले नाही. काही शेतकऱ्यांना व्ही. के. नंबर मिळाला; परंतु त्यांना रक्कम मिळाली नाही. सरसकट शेतकरी बाधित असताना तहसील कार्यालयाकडे बाधित शेतकऱ्यांची आकडेवारी निश्चित नाही. अनेक शेतकऱ्यांना फळबागांचे अनुदान मिळाले नाही. काही शेतकऱ्यांची दोन शिवारांत जमीन असल्याने ज्या शिवारात कमी जमीन आहे, त्या शिवाराचे अनुदान मिळाले नाही..Crop Damage Compensation: जतमधील अतिवृष्टिग्रस्तांना नुकसानभरपाईचे आश्वासन.अनुदानासाठी शेतकऱ्यांच्या तहसील कार्यालयात वारंवार चकरा सुरू आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही. शेतकरी त्रस्त झाल्याने आमदार डॉ. हिकमत उढाण यांनी शुक्रवारी (ता.१६) संपर्क कार्यालयात आढावा बैठक आयोजित केली आहे. या आढावा बैठकीत शेतकऱ्यांना न्याय मिळावा. तसेच संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे..तीन वर्षांपासून तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. या अनुदानासाठी तहसील कार्यालयात वारंवार चकरा मारून शेतकरी त्रस्त झाले आहेत. यासंबंधी अनेकवेळा आंदोलन केले. मात्र, तहसील कार्यालयातून ३१ जानेवारी व १५ फेब्रुवारीपर्यंत असे दोन टप्प्यांमध्ये अनुदान वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.- गजानन उगले, शेतकरी आंदोलनकर्ते.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.