Weather Alert : परभणी श्रीमहालक्ष्मींच्या आगमनासोबत परभणी व हिंगोली जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. या पावसाचा करपलेल्या सोयाबीन, कपाशी आणि तूर पिकांना फारसा फायदा होणार नसला, तरी मूग, उडदाची काढणी झाल्यानंतर जमीन तयार असल्यास रब्बी पेरणीसाठी त्याचा फायदा होऊ शकतो..दरम्यान, या दोन जिल्ह्यांतील ८२ मंडलांत शुक्रवारी (ता. १८) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील १३ आणि हिंगोली जिल्ह्यातील पाच, अशा एकूण १८ मंडलांत अतिवृष्टी झाली..Maharashtra Heavy Rainfall: राज्यातील १६ जिल्ह्यांतील २३० मंडळांत अतिवृष्टी, बीडला सर्वाधिक फटका.परभणी जिल्ह्यातील सर्व ५२ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी, मानवत आणि सोनपेठ तालुक्यांतील १३ मंडलांत अतिवृष्टी झाली. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४१.८ मिमी, तर सप्टेंबरमध्ये आतापर्यंत सरासरी ५५.८ मिमी पाऊस झाला. यंदा १ जूनपासून आतापर्यंत सरासरी ४१६ मिमी (६० टक्के) पाऊस झाला असून, अद्यापही २७७.७ मिमी पावसाची तूट आहे..Crop Loss: सोयाबीन, कापसाचे नुकसान.हिंगोली जिल्ह्यातील सर्व ३० मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्यांतील पाच मंडलांत अतिवृष्टी झाली. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ३८ मिमी, तर सप्टेंबरमध्ये आतापर्यंत सरासरी ५६.९ मिमी पाऊस झाला. यंदा १ जूनपासून आतापर्यंत सरासरी ५४०.९ मिमी (७३.८ टक्के) पाऊस झाला असून, अद्याप १९२.५ मिमी पावसाची तूट आहे..अतिवृष्टी झालेली मंडलेपरभणी जिल्हा : परभणी शहर ९४.५ मिमी, पेडगाव १११.५, जांब ९३.५, झरी १२६, सिंगणापूर ८१.५, पिंगळी ९९, टाकळी कुंभकर्ण ९४, कोल्हा ७२.५, ताडबोरगाव ७३.८, रामपुरी ८८, सोनपेठ ९२, आवलगाव ८०.८, शेळगाव ७५.५.हिंगोली जिल्हा : हिंगोली ६६.५ मिमी, टेंभुर्णी ७५.५, येळेगाव ८८.५, साळणा ६९.५, जवळा बाजार ६६.३ मिमी..मंडलनिहाय पाऊसपरभणी : दैठणा ३८, परभणी ग्रामीण ४३.५, जिंतूर ३१.५, सावंगी म्हाळसा २९.५, बामणी २९.५, बोरी ३६, आडगाव २५, चारठाणा ८.५, वाघी धानोरा २५.५, दूधगाव ६१, सेलू ११, देऊळगाव गात १०, वालूर ३३.५, कुपटा २७.५, चिकलठाणा ८.५, मोरेगाव ६, मानवत ३५, केकरजवळा ४१.८, पाथरी १९.५, बाभळगाव ४३.५, हादगाव १९.८, कासापुरी २३, वडगाव १९.८, गंगाखेड ३३, महातपुरी ३१.८, माखणी १०.५, राणीसावगरगाव २५, पिंपळदरी १२.५, पालम १५, चाटोरी २५, बनवस १०.८, पेठशिवणी १५, रावराजूर २१.३, पूर्णा १७.८, ताडकळस २४.८, लिमला २२.८, कात्नेश्वर ५९.५, चुडावा १७.८, कावलगाव २०..हिंगोली : नरसी नामदेव २१.५, सिरसम ५८, बासंबा ३९.५, डिग्रस कऱ्हाळे ५१.५, माळहिवरा ५८, खंबाळा ३९.५, कळमनुरी ३८.८, वाकोडी १६.३, नांदापूर ५१.५, आखाडा बाळापूर १९.५, डोंगरकडा ४२.५, वारंगा ३०.५, वसमत ३२.५, आंबा ५०.५, हयातनगर ५७, गिरगाव ३८.३, हट्टा १५.८, कुरुंदा ३०.८, औंढा नागनाथ ३५.३, गोरेगाव ९.३, आजेगाव ५, हत्ता २९.५..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.