Sangali News: सांगली जिल्ह्यातील २२ मंडलांत अतिवृष्टीमुळे २९१ गावांतील ९६ हजार १८६ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तब्बल ५१ हजार ३८७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक पिकांचे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले असल्याने शेतकरी हतबल झाला आहे..ऑगस्ट महिन्यात आलेला पूर आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी कोलमडून पडला होता. त्यानंतर पावसाने उसंत घेतली होती. मात्र सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाची हातातोंडाला आलेली पिके वाया गेली आहेत. ऑगस्टमध्ये पश्चिम भागातील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले होते..Crop Loss: कापणीच्या मुहूर्तावर अस्मानी संकट.या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून नुकसान भरपाईची मागणीही केली आहे.जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर मुसळधार पाऊस झाला. या पावसाने तासगाव, कवठेमहांकाळ, आणि जत या दुष्काळी पट्ट्यातील तालुक्यातील पिके बाधित झाली. त्यानंतर पावसाने उघडीप दिली होती. मात्र शनिवारी ६८ पैकी २२ मंडलांत अतिवृष्टी झाली..या पावसाने खरिपातील काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, वाळवा, शिराळा, विटा, आडपाडी, जत या तालुक्यांतील २९१ गावांतील ९६ हजार १८६ शेतकऱ्यांचे ५१३८७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे..Crop Loss Maharashtra : शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त, पण सरकारला पाझर फुटेना.यामध्ये १२०८४ हेक्टरवरील फळ पिकांना पावसाचा फटका बसला आहे. डाळिंब, द्राक्ष, ऊस, सोयाबीन, भुईमूग, मूग, उडीद, हळद, केळी या पिकांना सर्वाधिक नुकसान झाले. पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची प्रशासनाकडून पाहणी करण्याचे काम सुरू आहे. .अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांचे दृष्टिक्षेपतालुका शेतकरी संख्या गावांची संख्या क्षेत्रमिरज २३०५ २२ १५२९तासगाव १७२२० ६९ ८८६०.कवठेमहांकाळ ४०६०२ ६० ३१९८५वाळवा १४२ १९ ५९शिराळा २६ १ ०.८८विटा ७१५ ३८ ३९७आटपाडी २०१२२ ६० १२०९६जत १५०५१ ४४ ७९८९.अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २९१ गावांतील ९६ हजार १८६ शेतकऱ्यांचे ५३ हजार ३८७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक नजर अंदाज अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. नुकसानीच्या आकडेवारीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून दिले असून पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहे.- विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.