Latur News : अहमदपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जिरायत, बागायत, फळपिकांना फटका बसला आहे. दरम्यान, शासनाने तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत वर्ग करण्याची मागणी होत आहे..तालुक्यात सहा महसूल मंडळे असून, सप्टेंबर अखेर ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेले शेतकरी संख्या ५१ हजार ३३० व संबंधित शेतकऱ्यांचे बाधित क्षेत्र १५ हजार ४६७ हेक्टर आहे. तालुक्यात सहा मंडळे असून, मंडळनिहाय बाधित क्षेत्र खालील प्रमाणे आहे..Crop Damage Compensation : केळी, लिंबू उत्पादकांना भरपाईची अपेक्षा.अहमदपूर बाधित शेतकऱ्यांची संख्या ६ हजार १३५ असून, सोयाबीन १७५५, कापूस ४४१ असे एकूण २,१९६ हेक्टर, किनगाव बाधित शेतकऱ्यांची संख्या दहा हजार ४८४ असून सोयाबीन ३२१७, कापूस १२२ असे एकूण ३,३३९ हेक्टर, खंडाळी बाधित शेतकऱ्यांची संख्या ९ हजार ७५२ असून सोयाबीन १४३२, कापूस ९५४ असे एकूण २३८७ हेक्टर, शिरूर ताजबंद बाधित शेतकऱ्यांची संख्या ९ हजार ५७४ असून सोयाबीन २९८३, कापूस २१ असे एकूण ३,००४ हेक्टर, हडोळती बाधित शेतकऱ्यांची संख्या ७ हजार ६३५ असून सोयाबीन ८५० कापूस ५३१, तूर ७४४ असे एकूण २ हजार १२७ हेक्टर, अंधोरी बाधित शेतकऱ्यांची संख्या ७ हजार ७५० सोयाबीन ११३६ कापूस ८९५, तूर ३७९ असे एकूण २४११ हेक्टर बाधित क्षेत्र आहे. .Crop Damage Compensation : अहिल्यानगरच्या तेरा तालुक्यांत नुकसानीपोटी मिळणार मदत.तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेले ५१ हजार ३३० शेतकऱ्यांची संख्या असली तरी अतिवृष्टी झाल्यामुळे सर्वच पिकांचे कमी अधिक प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. सोयाबीन उत्पादनात घट आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..माझ्या शेतात तीन एकर कापूस पेरणी केली होती. अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मे २०२४ मध्ये मी अंजिराची बाग केली आहे. त्याला लागलेल्या फळांपैकी ५० टक्के फळे गळाली आहेत.- नाथराव खांडेकर, शेतकरी, खानापूर.तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीन पीक बरेच दिवस पाण्यात होते. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला असून, उत्पन्न घटले आहे. काही शेतकऱ्यांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले नसले तरी सर्व शेतकऱ्यांच्या सोयाबीनला फटका बसला आहे. उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे.- राजकुमार शिंदे, शेतकरी, खानापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.