Latur / Dharashiv News : दोन्ही जिल्ह्यांत मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जमिनी खरडून गेल्या असून अनेक भागात पिके पाण्याखाली जाऊन नुकसान झाले आहे. जनावरे मृत्युमुखी पडली असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गुरुवारी (ता. २८) लोकप्रतिनिधी पुढे आले. .औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी तातडीने आढावा बैठक घेऊन बाधित पिकांचे पंचनामे करण्याची सूचना प्रशासनाला केली, तर धाराशिव जिल्ह्यात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी एकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याबाबत प्रशासनाला बजावले आहे..Flood Crop Damage : ‘वारणे’च्या पुरामुळे पिकांची नासाडी; शेतीत दुर्गंधी.औसा मतदारसंघातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकांचे तसेच रस्ते व पुलांचे नुकसान झाले आहे. आमदार पवार यांनी गुरुवारी औसा येथे प्रशासकीय बैठक घेऊन या परिस्थितीचा आढावा घेत नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. दोन दिवसांत जिल्ह्यातील विविध भागांत मोठा पाऊस झाला असून, लामजना व किल्लारी या मंडळात अतिवृष्टी झाली. दोन्ही मंडळांत ७२ मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. .काही भागातील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, जिथे रस्ते व पुलाचे नुकसान झाले आहे, तिथे पाऊस ओसरल्यानंतर प्राधान्याने दुरुस्तीची कामे हाती घेण्यात यावीत, पाणी वाहत असलेल्या पुलावर पोलिस बंदोबस्त ठेवावा, आदी सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या..३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानराज्य आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत घालून देण्यात आलेल्या निकषात अनेक गावे बसत नाहीत. निकषात न बसणाऱ्या अनेक महसूल मंडळातील गावांमध्येही ३३ टक्क्यांपेक्षा अधिकचे नुकसान झालेले आहे. धाराशिव जिल्ह्यात सरासरी पावसाच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात ६८.८ टक्केपेक्षा जास्त पाऊस नोंदविला गेला आहे..Crop Damage Survey : सोलापूर जिल्ह्यात ६० टक्के पिकांचे पंचनामे पूर्ण.या मोठ्या आणि सततच्या पावसामुळे झालेले नुकसानही मोठे आहे. त्यामुळे जिल्ह्यात सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नदी, नाले, ओढे अद्यापही ओसंडून वाहत आहेत. .त्यामुळे अनेक ठिकाणी जमीन पूर्णतः खरवडून गेली आहे. पुरामुळे विहिरी गाळाने भरल्या आहेत. शेतातील ड्रिपसेटही वाहून गेले आहेत. यात पुन्हा अतिवृष्टी झाली आहे. एनडीआरएफ व एसडीआरएफच्या निकषात बसत नसलेल्या मंडळातही पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार पाटील यांनी कृषिमंत्र्यांकडे केली आहे..पंचनाम्यापासून एकही शेतकरी वंचित राहू नयेसावरगाव (ता. तुळजापूर) परिसरात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला. शेतकऱ्यांच्या मेहनतीचे पीक प्रतिकूल हवामानामुळे पूर्णपणे नष्ट झाले असून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवून द्यावी. .शासनानेही या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन त्वरित दिलासा द्यावा, अशी मागणी राजेनिंबाळकर यांनी केली. तालुक्यातील इतर काही गावांमध्येही सोयाबीनसह विविध पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र समोर येत असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाकडून पंचनामे सुरू होऊन एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहून नये, असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.