Indian Rain Update: देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले असून, केरळ, ओडिशा, आसाम आणि जम्मू-काश्मीर येथे पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळमध्ये भूस्खलनात तिघांचा मृत्यू झाला, तर आसाममध्ये यंदाच्या पुरातील मृतांचा आकडा ८२ वर पोहोचला असून, सुमारे दोन लाख नागरिकांना अजूनही फटका बसला आहे. ओडिशात हिराकूड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने दहा जिल्ह्यांना सजगतेचा इशारा देण्यात आला आहे. .दुसरीकडे, मुसळधार पावसामुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद असून, अमरनाथ यात्रेची नवीन तुकडी रवाना करण्यात आलेली नाही. आसाममधील पूरस्थितीत काहीशी सुधारणा झाली असली, तरी शिवसागर, गोलाघाट, जोरहाट, नागाव आणि चराईदेव हे पाच जिल्हे अजूनही पुराच्या विळख्यात आहेत. .Marathwada Heavy Rain: पावसाने मराठवाडा ‘चिंब’.राज्यात सुमारे १.९२ लाख नागरिक पूरग्रस्त असून, आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने यंदाच्या पुरातील मृतांचा आकडा ८२ वर पोहोचला आहे. गुरुवारी आठ जिल्ह्यांतील दोन लाखांहूनअधिक नागरिकांना पुराचा फटका बसला होता. त्यानंतर पाण्याची पातळी काही प्रमाणात ओसरली असली, तरी नद्या अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत..Heavy Rain Alert: कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा .ओडिशात पूरस्थिती गंभीरमहानदीवरील हिराकूड धरणातून २२ दरवाज्यांद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने ओडिशातील महानदीच्या खालच्या प्रवाहातील १० जिल्ह्यांना उच्च सजगतेचा इशारा देण्यात आला आहे. .पुरामुळे राज्यातील २० जिल्ह्यांतील ८.३४ लाखांहून अधिक नागरिकांना फटका बसला असून, पायाभूत सुविधांसह मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. सलांदी, ब्राह्मणी, बैतरणी, जलका आणि बुधाबलंग या नद्यांना आलेल्या पुरामुळे उत्तर ओडिशात १,३०० हून अधिक घरे नुकसानग्रस्त झाली आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.