IMD Forecast: पुणे जिल्ह्यात पावसाने पश्चिम पट्ट्यात सोमवारी (ता. ६) जोरदार हजेरी लावल्याने भात लागवडीला वेग आला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाण्याची आवक वाढली आहे. मुळशी तालुक्यातील आंबवणे येथे सर्वाधिक २३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मंगळवारी (ता. ७) देखील जिल्ह्याच्या काही भागांत पाऊस सुरूच होता..हवेली, मावळ, वेल्हा, भोर, खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि पुरंदर तालुक्यांतील अनेक महसूल मंडलांत समाधानकारक पाऊस झाला. तर पूर्वेकडील बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यांच्या बहुतांश भागात हलक्या ते मध्यम सरी पडल्याने खरीप पिकांसाठी आणखी पावसाची गरज कायम आहे..जिल्ह्याच्या पश्चिमेकडील मुळशी, मावळ, वेल्हा आणि भोर तालुक्यांत झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली असून डोंगराळ भागातील ओढे-नाले प्रवाहित झाले आहेत. या पावसामुळे भात लागवडीच्या कामांना वेग आला आहे. हवेली तालुक्यात पुणे वेधशाळा, केशवनगर, कोथरूड, खडकवासला, खेड, भोसरी, चिंचवड, कळस आणि हडपसर या मंडलांत चांगल्या पावसाची नोंद झाली. मुळशी तालुक्यात पौड, घोटावडे, थेरगाव, माले, मुठे, पिरंगूट, कासारआंबोली, सावरगाव, कोळवण, माण, पोमगाव आणि आंबवणे मंडळांत पावसाने दमदार हजेरी लावली..Rain Andaj : कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम; मध्य महाराष्ट्र, विदर्भातही पावसाचा अंदाज.भोर तालुक्यात भोलावडे, नसरापूर आणि वेळू येथे चांगला पाऊस झाला. मावळ तालुक्यात वडगाव मावळ, तळेगाव, काळे, कार्ला, खडकाळा, परिंदवाडी, ताकवे बुद्रुक, वाडेश्वर, कुसगाव आणि ताकवे खुर्द येथे दमदार पाऊस झाला; तर लोणावळा आणि शिवणे परिसरात हलक्या ते मध्यम सरींची नोंद झाली. वेल्हा तालुक्यात वेल्हा, पाणशेत, विंझर आणि आंबवणे या सर्व मंडळांत समाधानकारक पाऊस झाला..जुन्नर तालुक्यात राजूर, आपटाळे आणि मढ येथे पाऊस झाला, तर जुन्नर, नारायणगाव, वडगाव आनंद, निमगाव सावा, बेल्हा, डिंगोरे, ओतूर, वडज आणि ओझर परिसरात हलक्या ते मध्यम सरी पडल्या. खेड तालुक्यात राजगुरूनगर, पाईट, चाकण, आळंदी, कडूस आणि करंजविहिरे येथे पाऊस झाला, तर वाडा, कुडे, पिंपळगाव, कन्हेरसर आणि वेतोळे येथे हलक्या ते मध्यम सरी पडल्या. आंबेगाव तालुक्यात आंबेगाव मंडलात पावसाची नोंद झाली, तर घोडेगाव, कळंब, पारगाव, मंचर आणि निरगुडसर परिसरात हलक्या ते मध्यम सरी पडल्या..Maharashtra Heavy Rainfall: कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार शक्य.शिरूर तालुक्यात तळेगाव आणि पाबळ मंडळांत पाऊस झाला, तर टाकळी, वडगाव, न्हावरा, मलठण, रांजणगाव, कोरेगाव, शिरूर आणि निमोणे परिसरात हलक्या ते मध्यम सरी पडल्या. दौंड तालुक्यात पारगाव मंडळात पावसाची नोंद झाली; तर देऊळगाव, पाटस, यवत, कडेगाव, राहू, वरवंड, रावणगाव, दौंड, बोरीभडक, खामगाव, वडगावबांडे आणि बोरी पार्धी परिसरात हलक्या ते मध्यम सरी पडल्या. पुरंदर तालुक्यात सासवड, भिवंडी, कुंभारवळण, परिंचे, वाल्हा आणि शिवरी येथे पाऊस झाला, तर जेजुरी आणि राजेवाडी परिसरात हलक्या ते मध्यम सरी पडल्या. बारामती तालुक्यात बारामती, माळेगाव, पणदरे, वडगाव, लोणी, सुपा, मोरगाव आणि उंडवडी, तसेच इंदापूर तालुक्यात भिगवण, इंदापूर, लोणी, बावडा, काटी, निमगाव, अंथुर्णी आणि सणसर परिसरात केवळ हलक्या ते मध्यम सरींची नोंद झाली..मंगळवारी (ता. ७) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडलनिहाय पाऊस (स्रोत ः कृषी विभाग) (मिलिमीटर)हवेली : भोसरी १६८, चिंचवड १५३, खेड ११४, कळस ९१, पुणे वेधशाळा ८३, केशवनगर ८३, खडकवासला ८३, हडपसर ८०, कोथरूड ७९.मुळशी : आंबवणे २३४, माण १५३, माले, मुठे, कोळवण, पोमगाव १०९, पौड, घोटावडे, थेरगाव, पिरंगूट, कासारआंबोली, सावरगाव ७९.भोर : वेळू १४४, भोलावडे, नसरापूर ११०.मावळ : ताकवे खु. २०१, खडकाळा १७६, कुसगाव १७५, कार्ला १७०, काळे १६५, ताकवे बु. १६१, वडगाव मावळ, तळेगाव, परिंदवाडी, वाडेश्वर १५३..वेल्हा : वेल्हा १५३, आंबवणे ११०, पाणशेत, विंझर ८७.जुन्नर : राजूर, आपटाळे, मढ १०२.खेड : आळंदी १६८, पाईट, चाकण, करंजविहिरे १५३, कडूस ६८, राजगुरुनगर ६५.आंबेगाव : आंबेगाव १३६.शिरूर : तळेगाव ७९, पाबळ ६९.दौंड : पारगाव ६७.पुरंदर : परिंचे ९७, वाल्हा ८४, सासवड, भिवंडी ८०, शिवरी ७३, कुंभारवळण ६८..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.