Heavy Rain : सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस; अनेक भागांत पूरस्थिती

Weather Update : सोमवारी (ता. १५) पहाटेपासून देखील जोरदार पाऊस सुरू होता. किनारपट्टी भागाला वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपून काढले.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरूच असून सोमवारी (ता. १५) पहाटेपासून देखील जोरदार पाऊस सुरू होता. किनारपट्टी भागाला वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपून काढले.

Rain Update
Monsoon Rain : पुढील ५ दिवस पाऊस कसा राहणार? उद्यापासून मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता

त्यामुळे अनेक ठिकाणी पडझडीचे प्रकार घडले. जिल्ह्यात काही मार्गांवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली. तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडल्याने पुराचा धोका निर्माण झाला आहे. पावसाचा मोठा फटका जिल्ह्यातील रेल्वे वाहतुकीला बसला आहे.

Rain Update
Weekly Weather : हलक्या, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

जिल्ह्यात शनिवारी (ता. १३) दिवसभर जोरदार पाऊस झाला. रात्री पावसात आणखी वाढ झाली. रविवारी (ता. १४) दिवसभर मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. किनारपट्टीला पावसाचा जोर अधिक होता.

त्यामुळे सावंतवाडी-वेंगुर्ला मार्गावर होडावडा येथील पुलावरून पुराचे पाणी वाहत असून या मार्गावरील वाहतूक मठमार्गे वळविण्यात आली. मालवण तालुक्यातील देवली परिसरात अनेक घरांची पडझड झाली. जिल्ह्यातील तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडल्याने पुन्हा एकदा त्या भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com