Rain Update : कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपले

Pre-Monsoon Rain : : शहरासह जिल्ह्याला शनिवारी (ता. ११) सायंकाळपासून रविवारी पहाटेपर्यंत पूर्व मोसमी पावसाने झोडपले.
Rain
RainAgrowon

Kolhapur News : शहरासह जिल्ह्याला शनिवारी (ता. ११) सायंकाळपासून रविवारी पहाटेपर्यंत पूर्व मोसमी पावसाने झोडपले. थांबून थांबून बहुतांशी ठिकाणी पाऊस झाला. अचानक आलेल्या वळवाने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. इचलकरंजी, गडहिंग्लज, शिरोळमध्ये दमदार पाऊस झाला. कागल तालुक्यातील नानीबाई चिखली येथे तीन घरांचे अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले.

जिल्ह्यात गेले दोन दिवस सायंकाळनंतर केवळ ढगाळ वातावरण होत होते. त्यामुळे उष्म्यामध्ये आणखी वाढ होत होती. शनिवारी सायंकाळी साडेसातनंतर जोरदार वाऱ्यासह पावसाने वस्त्रनगरीत जोरदार हजेरी लावली. सुमारे दीड तास पावसाची रिपरिप सुरू होती. शिरोळमध्ये बाजारात व्यापाऱ्यांची तसेच नागरिकांची मोठी धांदल उडाली. सायंकाळी सातच्या सुमारास शिरोळ, घालवाड, कुटवाड, शिरटी व शिरोळ परिसरात वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली.

Rain
Pre Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व वादळी पावसाचा दणका

गडहिंग्लज शहरासह परिसरात सायंकाळी जोरदार वळीव बरसला. गेल्या महिनाभरात तीन-चार वेळा वळवाने तालुक्यात हजेरी लावली होती. आकनूर, तुरंबे, सरवडे परिसराला वळवाने झोडपले. रात्री नऊच्या दरम्यान विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. कोवाड येथील परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले.

तेऊरवाडी येथील ग्रामपंचायत इमारतीवरील पत्र्याचे शेड वादळी वाऱ्याने उडून शेजारच्या मारुती पाटील यांच्या घरावर पडल्याने अंदाजे चार लाखांचे नुकसान झाले. आजऱ्यासह उत्तूर परिसरात विजांच्या कडकडाटासह वळवाचा पाऊस झाला.

Rain
Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी वादळी पावसाचा दणका सुरूच

नानीबाई चिखलीत तीन घरांचे नुकसान

वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह आलेल्या मुसळधार पावसामुळे नानीबाई चिखली परिसराला अक्षरशः झोडपून काढले. सुमारे तासभर झालेल्या या वादळी पावसात सुमारे सहा-सात घरांचे अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. चिखली - कोडणी रोडवर असलेल्या बेनाडे वस्तीवरील तीन घरांवर काही अंतरावरील शेड उडून पडल्यामुळे तिन्ही घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

यामध्ये बेनाडे वस्तीनजीक असणाऱ्या हरीश पाटील यांच्या जनावरांच्या गोठ्याचे मोठ्या आकाराचे शेड वादळी वाऱ्यामुळे उडून राजाराम बेनाडे, विठ्ठल बेनाडे, विजय बेनाडे यांच्या घरावर येऊन पडले. यामुळे घरांचे मोठे नुकसान झाले. तर चौगुले, मगदूम वस्तीवरील धनाजी घाटगे, यशवंत मगदूम यांच्या जनावरांसाठी उभारलेल्या शेडचेही वादळी पावसामुळे नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com