Hingoli News : जिल्ह्यात यंदा (२०२५) जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे २ लाख ७३ हजार ४१३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. पीकनुकसानीपोटी ३ लाख ८ हजार ४७१ शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी २३५ कोटी ६ लाख रुपयावर निधी वितरणाास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. .जून महिन्यामध्ये झालेल्या वादळी वारे, पावसामुळे हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढानागनाथ, सेनगाव या पाच तालुक्यातील ३ हजार २४७ शेतकऱ्यांच्या जिरायती, बागायती, फळपिके मिळून एकूण १ हजार ६११.३७ हेक्टर क्षेत्रावरील ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले..बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी मागणी केलेल्या ३ कोटी ६० हजार ४४ हजार ९०० रुपये निधी वितरणास मंजुरी देणारा शासन निर्णय ६ ऑगस्ट रोजी काढण्यात आला. जुलै महिन्यातील पावसामुळे सेनगाव तालुक्यातील ३९५ शेतकऱ्यांच्या २१५ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे..Crop Damage : संत्रा उत्पादकांसह पारंपरिक पिकांचे ७५ टक्के नुकसान .बाधित शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी मागणी केलेल्या १८ लाख २७ हजार ५०० रुपये निधी वितरणास शुक्रवारी (ता. १२) महसूल व वनविभागाने काढलेला शासन निर्णयाद्वारे मंजुरी दिली. .ऑगस्ट मधील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व ५ तालुक्यांतील २ लाख ७१ हजार ९४ हेक्टर जिरायती पिके,४७९.४२ हेक्टर, बागायती पिके तर २१.८० हेक्टरवरील फळपीकांचे असे एकूण २ लाख ७१ हजार ५८६ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांची संख्या ३ लाख ४ हजार ८२९ एवढी आहे..Crop Damage Compensations : लातूर जिल्ह्याला २४४ कोटींची मदत.शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मागणी करण्यात आलेल्या २३१ कोटी २७ लाख ९२ हजार ३३५ रुपये निधी वितरणास मंगळवारी (ता. २३) महसूल व वन विभागातर्फे काढण्यात आलेल्या शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आली. .बाधितांना २ हेक्टरच्या मर्यादेत मदत...बाधित शेतकऱ्यांना जिरायती पिकांच्या नुकसानीपोटी हेक्टरी ८ हजार ५०० रुपयेनुसार बागायती पिकांच्या नुकसानीपोटी हेक्टरी १७ हजार रुपये नुसार,फळपीकांच्या नुकसानीपोटी हेक्टरी २२ हजार ५०० रुपयेनुसार २ हेक्टर मर्यादेत अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यावर जमा केली जाईल, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले..अतिवृष्टने बाधित क्षेत्रएकूण बाधित क्षेत्र : २,७३,४१३ हेक्टरएकूण बाधित शेतकरी : ३,०८,४७१एकूण मंजूर निधी : २३५ कोटी ६ लाख .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.