Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. रविवारी (ता. २१) रात्री जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला. तब्बल ४२ पैकी २२ मंडलांत अतिवृष्टी झाली. परंडा व भूम तालुक्यात तर पावसाने हाहाकार माजावला. सोमवारी (ता. २२) सकाळीही पाऊस कोसळत होता. पुराने घरातील साहित्य आणि शेतातील उभे पिक उद्धवस्त केले. .परंडा तालुक्यातील अनेक रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने शहरासह अनेक गावांचा संपर्क तुटला होता. विविध ठिकाणी पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफ व लष्कराची मदत घेतली असून लष्कराने हेलिकॉप्टरच्या साह्याने बचाव कार्य करत ३४ जणांची सुखरूप सुटका केली. अजूनही बचावकार्य सुरु आहे. पावसाने उरल्यासुरल्या पिकांच्या आशा संपुष्टात आल्याचे शेतकरी सांगत आहेत..Ahilyanagar Heavy Rain: अहिल्यानगरला मुसळधार.परंडा तालुक्यात रविवारी (ता. २१) रात्रीचा पाच तास काळ होऊन थैमान घालणाऱ्या पावसाने तालुक्यातील नागरिकांचे जनजीवन उद्ध्वस्त केले. तालुक्यात ढगफुटी झाल्याचे चित्र आहे. नद्यांना आलेल्या महापुराने अनेकांच्या घरातले संसार उपयोगी साहित्य दारातले गोधन अन् शेतातील उभे पीक सारेच वाहून गेले..प्रशासनाने पुरात ठिकठिकाणी अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरच्या साह्याने सुरक्षित स्थळी हलविले. यापूर्वीच झालेल्या पावसाने सर्वच प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे अनेक नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. यातच रविवारी रात्री पाच तास परिसरात जोरदार पाऊस झाल्याने सर्वच नद्यांना महापूर आला आहे..Pune Heavy Rain: पावसाचा जिल्ह्यात २७३ हेक्टरला फटका.पुराच्या वेढयात अडकलेल्या लाखी, रुई, दुधी, वडनेर, देवगाव, ढगपिंपरी येथील पन्नास पेक्षा जास्त नागरिकांना लष्कर व आपत्ती व्यवस्थापन टीमने सुरक्षीत स्थळी हलविले. पांढरेवाडी प्रकल्प शंभर टक्के भरल्याने खैरी नदीला महापूर आला. त्यामुळे शेळगाव जवळील शाळेसह परिसरातील अनेक घरांना पुराच्या पाण्याने वेढा घातला..तर शंभर टक्के भरलेल्या खासापूरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने उल्का नदीला महापूर आल्याने वडनेर देवगाव येथील नसराळे चौधरी वस्तीला पुराच्या पाण्याने वेढा दिला. तेथे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. चांदणी नदीला पुर आल्याने सिरसाव येथील पुरातन महालक्ष्मीच्या मंदिराच्या परिसरासह जवळील घरांना पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने मोठे नुकसान झाले..Marathwada Heavy Rain: मराठवाड्यातील ९ मंडलांत अतिवृष्टी.चांदणी व उल्का नद्यांचा संगम होऊन दोन्ही नद्या एकत्र वाहू लागल्याने आवरपिंपरी जवळील एक हॉटेल पाण्याखाली गेले. महापूरामुळे नदी काठावरील घरांचे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील उभ्या पिकात अनेक फूट पाणी जमा झाले आहे. शेतातील उभे पिके शेत जमीन वाहून गेली आहे. महापूरामुळे परंडा-बार्शी, परंडा-कुर्डुवाडी रस्ता बंद आहे. तर सीना-कोळेगाव प्रकल्पातून ५१ हजार ९६० क्युसेक ने नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे..आगरकर गल्ली, मोमीन गल्ली खासापूरी रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी साचले होते. पुरातन भवानी शंकर मंदिरात पाणी जमा झाले आहे तालुक्यातील सर्वात मोठ्या सीना कोळेगाव धरणासह निम्न खैरी, इनगोंदा साठवण तलाव, खासापूर प्रकल्प, साकत मध्यम प्रकल्प, चांदणी धरण आदी लहानमोठे प्रकल्प पावसाने तुडूंब भरुन वाहत आहेत. यामुळे नद्यांना पुर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे..नदीच्या पात्राबाहेर पुराचे पाणी आले असून अनेक रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे. चांदणी व उत्का नदीकाठी असलेल्या वस्त्यांवरील नागरिक पुरामध्ये अडकले असून त्यांची सुटका एनडीआरएफ व लष्कराच्या साह्याने करण्यात येत आहे. सकाळी नरसाळे वस्तीतील सहा जणांना हेलिकॉप्टरच्या साह्याने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. हिवरे वस्तीवर अडकलेल्या नागरिकांचा बचाव पथकाकडून शोध सुरु होता..मदतीसाठी लष्काराला पाचारण करण्यात आले आहे. लाखी (ता. परंडा) येथे पुरामध्ये अडकलेल्या १३ महिला, दोन मुले व बारा पुरुषांची लष्कराच्या पथकाने हेलिकॉप्टरच्या साह्याने सुटका करुन त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. शोध व बचाव कार्यासाठी लष्कराची एक तुकडी दाखल झाली असून दुसरी तुकडी येत आहे. यासोबत एनडीआरएफ व स्थानिक प्रशासनाकडून शोध व बचाव कार्य सुरु असल्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सांगितले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.