Dharashiv News : जिल्ह्यात ऑगस्टमध्ये अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारकडे १८९ कोटी ६० लाख ६७ हजार ५५ रुपये निधीची मागणी नोंदवली आहे. .सप्टेंबरमधील नुकसानीची मोजदाद सध्या सुरु असून भरपाईसाठी लवकरच निधीची मागणी करण्यात येणार आहे. ऑगस्टमध्ये दोन लाख ३४ हजार ९५५ शेतकरी बाधित झाली असून दोन लाख २२हजार ९७५ हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे..जिल्ह्यात १३ ऑगस्ट त्यानंतर मुसळधार पावसासह अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे नदी व नाल्यांना पुर येऊन नदीकाठची पिके पाण्याखाली गेली. यासोबत अनेक दिवस पावसाचा जोर कायम राहिल्याने पिके पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान झाले. यासोबत जमिनी खरडून गेल्यानेही शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने पूर्ण करून सरकारकडे भरपाईसाठी निधीची मागणी केली आहे. .Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणारच.यात राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या निकषानुसार जिरायती पिकांसाठी हेक्टरी साडेआठ हजार, बागायती पिकांसाठी हेक्टरी १७ हजार तर फळपिकांसाठी हेक्टरी २२ हजार पाचशे रुपये भरपाई मिळणार आहे. तीन हेक्टरच्या मर्यादेत ही भरपाई मिळणार आहे. ऑगस्टमध्ये अन्य तालुक्याच्या तुलनेने उमरगा व परंडा तालुक्यात कमी नुकसान झाले. .उर्वरित तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. बाधित क्षेत्रापैकी दोन लाख २२२ हजार हेक्टवरील जिरायती, ७८ हेक्टवरील बागायती तर ७.७० हेक्टवरील फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. जिरायती पिकांच्या भरपाईसाठी १८९ कोटी ४५ लाख रुपये, बागायती पिकांसाठी १३ लाख ३५ हजार रुपये तर फळपिकांसाठी एक लाख ७३ हजार २५० रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे..Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई.खरडलेल्या जमिनीसाठी एक कोटीची मागणीअतिवृष्टीमुळे नदी व नाल्यांना पूर येऊन मोठ्या प्रमाणात जमिनी खरवडून गेल्या. यात दरड कोसळणे, जमीन खरडणे, खचणे व नदीचे पात्र किंवा प्रवाह बदलल्यामुळे वाहून गेलेल्या जमिनीसाठीही हेक्टरी ४७ हजार रुपये भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निधीची मागणी केली आहे. .ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील परंडा व कळंब तालुक्यातील चौदा गावांतील ९४१ शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. या शेतकऱ्यांना २५२ हेक्टरसाठी एक कोटी १८ लाख ४८ हजाराची भरपाई देण्यासाठी निधी मागणी करण्यात आली आहे. अन्य तालुक्यांत जमीन खरवडून जाण्याचे प्रकार घडले नाहीत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.