Parbhani News: आठवडाभराच्या उघडिपीनंतर परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील ६४ मंडलांत सोमवारी (ता.६) सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील परभणी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या ५ तालुक्यांतील १२ मंडलांत अतिवृष्टी झाली. आवलगाव (ता.सोनपेठ) मंडलात ११२.३ मिमी पावसाची नोंद झाली. कापणी केलेले सोयाबीन, वेचणीस आलेला कापूस, भाजीपाला पिकांची मुसळधारेने धुळधाण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे..परभणी जिल्ह्यात रविवारी (ता.५) मध्यरात्रीनंतर ढगांच्या गडगडात जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत सोमवारी (ता.६) सकाळी साडेआठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये परभणी जिल्ह्यातील ५२ पैकी ४७ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी शहरातील हवामान विभागाच्या वेधशाळेत १२१.४ मिमी, तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामानशास्त्र विभागात ९८.२ मिमी पावसाची नोंद झाली..Sugarcane Crop Loss: अतिवृष्टीचा उसाला मोठा दणका.परभणी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील १२ मंडलांत पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात मागील २४ तासांमध्ये सरासरी ३४.६ मिमी, तर ऑक्टोबरमध्ये आजवर ३४.८ मिमी पाऊस झाला. यंदा १ जूनपासून आजवर सरासरी ९५७.६ मिमी (१२३.४ टक्के) पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी १७ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. कळमनुरी, वसमत तालुक्यांतील काही मंडलात पावसाचा जोर होता. जिल्ह्यात मागील २४ तासांमध्ये सरासरी ६.६ मिमी, तर ऑक्टोबरमध्ये आजवर सरासरी ८.७ मिमी पाऊस झाला. १ जूनपासून आजवर सरासरी ११४२.९ मिमी पाऊस झाला..Crop Loss: धाराशिवला पाऊस थांबला, पण संकट वाढले.अतिवृष्टी झालेली मंडले...परभणी शहर ६८.८, पेडगाव ७२, जांब ६८.३, टाकळी कुंभकर्ण ८६.५, आवलगाव ११२.३, वडगाव ८१.८, महातपुरी ७२.३, माखणी ६६.५, पालम ७६, पेठशिवणी ९९.३, लिमला ६६.३, चुडावा ६८.५..बोरणा नदीला पूर आणि गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमुळे आधीच खूप नुकसान झाले. त्यात रविवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने कापणी केलेले सोयाबीन, बोंडातून फुटलेला कापूस भिजून खराब झाला आहे. या पावसाने उरलेसुरलेदेखील हातून गेले आहे. सरकारने वाढीव दराने मदत द्यावी.- योगीराज धोंडगे,आवलगाव, ता. सोनपेठ, जि. परभणी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.