Maharashtra Heavy Rain: कोकण, घाटमाथ्यावर पुन्हा मुसळधार

Monsoon Rain Update: कोकण, घाटमाथ्यावर काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा या भागात पावसाने जोरदार सुरुवात केली. अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे.
Heavy Rain
Heavy RainAgrowon
Published on
Updated on

Pune News: कोकण, घाटमाथ्यावर काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा या भागात पावसाने जोरदार सुरुवात केली. अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत एकूण १२३ मंडलांत अतिवृष्टी झाली. मंगळवारी (ता. १५) सकाळी आठपर्यंत ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक १९० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे कोकणातील अनेक नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. रायगडमधील ३१ मंडलांत, तर रत्नागिरीतील ६४ मंडलांत, सिंधुदुर्गमधील २२ मंडलांत अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली. त्यामुळे भात खाचरे ओसंडून वाहत असून धबधबे प्रवाहित झाले आहेत. ओढे, नाल्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली असून धरणातील पाणी पातळीत वेगाने वाढ होऊ लागली आहे.

Heavy Rain
Monsoon Rain: उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

मुंबई महानगरपालिकेअंतर्गत असलेले मोडकसागर हे धरण १०० टक्के भरले. तर तानसा ९४, विहार ५०, तुलसी ५१, मध्य वैतरणा धरणांत ९४ टक्के पाणीसाठा झाला आहे. जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून खेड शहर, अलसुरे, चिचघर, प्रभू वाडी या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

Heavy Rain
Rain Crop Damage: पिके पाण्यात, शेतकरी तणावात

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून घाटमाथ्यावर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. त्यामुळे धरणातील आवक काहीशी कमी झाल्याने विसर्गात घट करण्यात आली होती. परंतु मागील दोन दिवसांपासून पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. सोमवारी (ता. १४) दुपारनंतर वातावरण अचानक बदल झाला असून पावसाला सुरुवात झाली.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पश्चिम पट्ट्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहिला. पुणे जिल्ह्यात संततधार पाऊस असून मुळशी धरणक्षेत्रात ११२ मिमी पाऊस पडला. मुठा आणि निरा खोऱ्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक होता. तर कुकडी धरणक्षेत्रात पावसाच्या तुरळक सरी पडल्या. तर साताऱ्यातील तीन मंडलांत, कोल्हापुरातील चार मंडलांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे धरणांत वेगाने आवक सुरू झाली असून उरमोडी, तारळी, कोयना, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com