Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे एकूण २ लाख ९९ हजार ८१८ हेक्टर म्हणजेच ७ लाख ४९ हजार ५४५ एकर क्षेत्र बाधित झाले आहे. यात फक्त सप्टेंबर महिन्यातच २ लाख ५३ हजार ६३६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. .राज्याचा विचार करता, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार ३३ लाख ५१ हजार १७५ हेक्टर म्हणजे ८३ लाख ७७ हजार ९३७ एकर बाधित क्षेत्र आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळी आधीच मदत देण्याच्या सरकारचा प्रयत्न आहे असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले..कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी (ता. २४) सायंकाळी शेवगाव तालुक्यातील भगूर (ता. शेवगाव) आणि परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. आमदार मोनिका राजळे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले, जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोरावळे, तहसीलदार आकाक्ष दहाडदे, तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड, गटविकास अधिकारी सोनल शहा यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते..Rain Crop Damage : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश!.श्री. भरणे म्हणाले, की राज्यातील बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, भाजीपाला, फळपिके, मका, इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे..अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर, पारनेर, पाथर्डी, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, शेगाव, संगमनेर, अकोले, कोपरगाव आणि राहाता या तालुक्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात मोठे नुकसान झाले आहे. राज्यात ८३ लाख हेक्टर, तर अहिल्यानगर जिल्ह्यात ७ लाख ४९ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. .Crop Damage Compensations : लातूर जिल्ह्याला २४४ कोटींची मदत.त्यापैकी जवळपास ८० टक्के म्हणजे ६ लाख ३४ हेक्टर शेतीचे नुकसान एकाच महिन्यात झाले आहे. अतिवृष्टी व महापुराने तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची घरे, पिके, पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्यात येईल.विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शंभुराज देसाई, जयकुमार गोरे यांनीही अहिल्यानगर जिल्ह्यातील सीना नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली..शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथाकृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोर पुरामुळे व पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत वरूरचे सरपंच सचिन म्हस्के, भगूरचे माजी सरपंच वैभव पुरनाळे, साईनाथ म्हस्के, सुनील पाटील, विकास मुरदारे, संभाजी पुरनाळे, वासुदेव मुरदारे, विजय पाटील, निवृत्ती पुरनाळे, दशरथ भापकर, पांडुरंग मुरदारे, सुरेश मुरदारे, श्रीकांत मुरदारे आदी शेतकऱ्यांनी नांदणी व चांदणी नदीला आलेल्या महापुरामुळे पिकांच्या व शेतीच्या झालेल्या नुकसानीची माहिती देत व्यथा मांडल्या. २०२१ मध्येझालेल्या नुकसानीची अद्यापपर्यंत मदत मिळाली नाही. यंदाही प्रचंड नुकसान होऊन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.