उष्णतेची लाट; पावसाची शक्‍यता

हे वादळ मंगळवार (ता.१२) रोजी पश्‍चिम किनारपट्टीच्या दिशेने येईल आणि जोराचे पाऊस होतील. बुधवारी (ता.१३) अरबी समुद्रातही हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल.
Heat Weave
Heat Weave Agrowon

महाराष्ट्रावर आज आणि उद्या हवेचा दाब (Air pressure) १००८ हेप्टापास्कल इतका राहील. मंगळवार (ता.१२) रोजी हवेच्या दाबात घसरण होऊन तो १००० हेप्टापास्कल (Heptapascal) इतका राहील. बुधवार (ता.१३) रोजी हवेच्या दाबात आणखी घसरण होऊन तो १००२ हेप्टापास्कल Heptapascal) इतका कमी होईल. जेव्हा तापमान वाढते, तेव्हा हवेचे दाब कमी होतात. शुक्रवार (ता.१५) रोजी हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल व ते पुढेही कायम राहील.
बंगालच्या उपसागरात आजपासून चक्राकार वारे (Circular winds) वाहण्यास सुरुवात होईल आणि उद्या लहान चक्रीय वादळाची निर्मिती होईल. हे वादळ मंगळवार (ता.१२) रोजी पश्‍चिम किनारपट्टीच्या दिशेने येईल आणि जोराचे हे वादळ मंगळवार (ता.१२) रोजी पश्‍चिम किनारपट्टीच्या दिशेने येईल आणि जोराचे पाऊस होतील. (ता.१३) अरबी समुद्रातही हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. गुरुवारी (ता.१४) पश्‍चिम किनारपट्टीला हे वादळ धडकणे शक्‍य आहे.

Heat Weave
पूर्वमोसमी वादळी पाऊस, गारपिटीचा पिकांना तडाखा

उत्तर भारतातील (North India) हवेचे दाब १००० हेप्टापास्कल इतके कमी होतील. त्यामुळे उत्तर भारतातही उन्हाळ्याची (Summer) तीव्रता जाणवेल. शुक्रवारी (ता.१५) बंगालच्या उपसागरात पुन्हा दुसऱ्या चक्रीवादळाची निर्मिती होईल. उष्णतेची लाट व ढगाळ हवामानासह पावसाची शक्‍यता अशी विचित्र हवामान स्थिती, अस्थिर वातावरणाच्या हवामानामुळे जाणवेल. हवामान बदलाचा हा परिणाम आहे. एप्रिल महिन्यात होणारा पाऊस हा साधारणपणे ला-निना व अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागराच्या पाण्याचे तापमान वाढल्यामुळे होईल.

कोकण :
कमाल तापमान पालघर, ठाणे व रायगड जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३५ ते ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान (Temperature) सर्वच जिल्ह्यांत २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. पालघर व ठाणे जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५१ टक्के, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ८१ ते ९१ टक्के राहील. पालघर व ठाणे जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १३ ते १८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ कि.मी. आणि वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र :
नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान (Temperature) ४१ अंश सेल्सिअस तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात ४२ ते ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २१ ते ३१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७ ते ८ टक्के राहील. बाष्पीभवनाच्या वेगात वाढ होईल. वाऱ्याचा ताशी वेग धुळे जिल्ह्यात १७ कि.मी., तर उर्वरित जिल्ह्यांत ११ ते १३ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

Heat Weave
विदर्भ, मध्य महाराष्ट्रात तापमान चाळिशी पार

मराठवाडा :
कमाल तापमान नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ४५ अंश सेल्सिअसपर्यंत, तर जालना जिल्ह्यात ४४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. उर्वरित उस्मानाबाद, औरंगाबाद, लातूर व बीड जिल्ह्यांत कमाल तापमान (Temperature) ४३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. उष्ण लहरी जाणवतील. उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान २८ अंश सेल्सिअस तर लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. जालना व बीड जिल्ह्यांत किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस, तर औरंगाबाद जिल्ह्यात २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. मात्र उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १३ ते २९ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७ टक्के इतकी कमी राहील. जालना व उस्मानाबाद जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १७ कि.मी. तर उर्वरित जिल्ह्यात ताशी ७ ते ११ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ :
बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १२ ते १४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६ ते ७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १७ कि.मी. राहील. वाऱ्याची (Air Direction) दिशा वायव्येकडून राहील.

Heat Weave
या आठवड्यात तापमान वेगाने वाढण्याची शक्यता

मध्य विदर्भ :
कमाल तापमान यवतमाळ (Temperature yavatmal) जिल्ह्यात ४५ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ४४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १६ ते २६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५ ते ६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ कि.मी. आणि दिशा आग्नेयेकडून राहील.

पूर्व विदर्भ :
चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली जिल्ह्यात ४४ अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, गडचिरोली जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४२ ते ४९ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७ ते १३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र :
कमाल तापमान (Temperature) कोल्हापूर जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस, पुणे व नगर जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस व सोलापूर जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सोलापूर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. कोल्हापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ टक्के, सांगली व सातारा जिल्ह्यात ७१ ते ७६ टक्के, तर सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ३५ ते ४४ टक्के, नगर जिल्ह्यात २६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ८ ते ११ टक्के, तर कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत १३ ते २७ टक्के राहील. सोलापूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग २० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

कृषी सल्ला : (Agricultural Advice:)
- काढणीस तयार हरभरा, (Gram) गहू पिकाची कापणी आणि मळणीची कामे पूर्ण करावीत.
- नारळाच्या नवीन लागवड केलेल्या रोपांना काठीचा आधार देऊन सावली करावी.
- द्राक्ष बागेत एप्रिल छाटणीची कामे पूर्ण करावीत.
- उन्हाळी भुईमूग पिकावरून मोकळा ड्रम फिरवावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com