Heat Stroke Center : नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात स्थापणार उष्माघात कक्ष

राज्यासह नाशिक जिल्ह्यातही तापमान ४० अंशांच्या पुढे जाऊन उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Heat Wave
Heat WaveAgrowon
Published on
Updated on

Nashik News : राज्यासह नाशिक जिल्ह्यातही तापमान ४० अंशांच्या पुढे जाऊन उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) व्यक्त केली आहे. यातच राज्यात उष्माघाताने बळींची संख्या वाढत आहे.

अशा पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेतील आरोग्य विभाग दक्ष झाला असून, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील ११२ प्राथमिक आरोग्य केंद्रे, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात एक कक्ष स्थापन होणार आहे. या वातानुलुकीत कक्षामध्ये पाणी, प्राथमिक किट, थंडावा निर्माण करणारी फळे यांचा समावेश असणार आहे.

दरम्यान, या आदेशआन्वये ओझर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी (ता. १८) कक्षाची स्थापना करण्यात आली.

Heat Wave
Poultry Management : कोंबड्यांतील उष्माघात रोखाण्यासाठी काय कराल?

केंद्र सरकारनेही याबाबत आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यात प्रत्येक तालुक्याने, प्राथमिक आरोग्य केंद्राने या मार्गदर्शक सूचनांनुसार आपला उष्णता कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

तसेच, उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्युचे डेथ ऑडिट जिल्हास्तरीय डेथ ऑडिट कमिटीमार्फत नियमितपणे करण्यात यावे. कोणत्याही मृत्युचे डेथ ऑडिट एक आठवड्याच्या आत करावे.

सार्वजनिक ठिकाणी उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात. यात बस स्टॅंड, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा, धार्मिक ठिकाणे, बँका, पेट्रोल पंप, मुख्य रस्ते आदी सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे.

उन्हात लोकाना विश्रांतीसाठी थंड सावलीच्या जागा निर्माण करणे. धार्मिक ठिकाणे, धर्मशाळा दिवसभर खुल्या ठेवणे. बाग, टेरेसना उष्णता विरोधी रंग लावणे, कार्यालये, शाळा, महाविद्यालयांच्या कामाच्या वेळा बदलणे आदी सूचनांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com