Mint Benefits : आरोग्यदायी पुदिना

Healthy mint : पदार्थाला चांगली चव व विशिष्ट गंध येण्यासाठी पुदिन्याचा वापर केला जातो. पानाला विशिष्ट गंध असतो.पुदिना ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, वायूहारक, पाचक व वातानुलोमन करणारी आहे.
Mint Benefits
Mint BenefitsAgrowon


डॉ. एकनाथ शिंदे, डॉ. अनिल घोरबांड

Mint : पदार्थाला चांगली चव व विशिष्ट गंध येण्यासाठी पुदिन्याचा वापर केला जातो. पानाला विशिष्ट गंध असतो.पुदिना ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, वायूहारक, पाचक व वातानुलोमन करणारी आहे.

पुदिन्याची पाने ही आकाराने तुळशीच्या पानांप्रमाणे परंतु जास्त गर्द हिरवी, लहान व लंबगोल असतात. पुदिना मध्य-पूर्व देश, भारत, ब्रिटिश आणि अमेरिकन पदार्थांमध्ये चहा, पेय पदार्थ, कँडी, जेली, सिरप, आइस्क्रीममध्ये पुदिन्याचा वापर केला जातो. चव वाढविण्याबरोबरच पदार्थ सकस व आरोग्यपूर्ण बनवण्याचे काम पुदिना करतो. पानाला विशिष्ट गंध असतो. पुदिनाच्या पानांमध्ये इतर कोणत्याही औषधी वनस्पतींपेक्षा जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात.
१) ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, वायूहारक, पाचक व वातानुलोमन करणारी आहे.
२) पोटदुखीवर उपयोगी आहे. पुदिना खाल्ल्याने पोट साफ व लघवी साफ होते. याच्या सेवनाने लघवीचे प्रमाण वाढते. डोकेदुखी, दातदुखी, वातविकारावर उपयुक्त आहे.
३) आतड्यांच्या आजारावर उपयुक्त आहे.
४) दीपक, पाचक, रुचकर स्वादप्रिय, हृदय, उष्ण वात व कफ दोषहारक व कृमिनाशक आहे.
५) कॅल्शिअम लोह, फॉस्फरस क, ड व ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते, मात्र ब जीवनसत्त्व अत्यल्प प्रमाणात असते. त्याचबरोबर प्रथिने, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ असतात.

Mint Benefits
Mint Health Benefits : सुगंधी, औषधी पुदिना...

पुदिन्यातील पोषक घटक : (१०० ग्रॅम)
१. प्रथिने-३.८ ग्रॅम
२. पाणी-७८.६ ग्रॅम
३. राख-१.८ ग्रॅम
४. कर्बोदके-१५ ग्रॅम
५. तंतुमय घटक- ८ ग्रॅम
६. चरबी-९४० मिलिग्रॅम
७. ओमेगा -३ फॅटी ॲसिड- ४३५ मिलिग्रॅम
८. ओमेगा -६ फॅटी ॲसिड-६९ मिग्रॅ
९. जीवनसत्त्व क -३२ मिलिग्रॅम
१०. कॅल्शिअम-२४३ मिलिग्रॅम
११. लोह - ५.१ मिग्रॅ
१२. मॅग्नेशिअम- ८० मिलिग्रॅम
१३. फॉस्फरस- ७३ मिलिग्रॅम
१४. पोटॅशिअम- ५६९ मिलिग्रॅम
१५. सोडिअम-३१ मिलिग्रॅम


उपयोग ः
१) क्रीम, टूथपेस्ट, च्युइंगम, ब्रीद फ्रेशनर, कॅण्डी, कुकीज आणि केकमध्ये चॉकलेट निर्मितीमध्ये पुदिना वापरतात. कॉस्मेटिक उत्पादने, ॲरोमाथेरपी आणि नैसर्गिकरीत्या तयार केलेल्या कीटकनाशकांमध्ये वापर होतो.
२) पचनशक्ती सुधारून भूक चांगली लागते. आतड्याची हालचाल वाढून पोटातील गॅस कमी होतो.
३) सर्दी-खोकला व ताप जाणवत असेल तर पुदिना, तुळस व आले यांच्यापासून बनविलेला काढा गुणकारक आहे.
४) डोळ्यांचे विकार तसेच रातांधळेपणा दूर होण्यास मदत होते. यामधील अ जीवनसत्त्वामुळे डोळ्यांचे विकार कमी होतात.
५) त्वचाविकारांवर पुदिन्याचा रस अत्यंत गुणकारी आहे. खरूज व नायटा यावर पुदिन्याचा पानाचा लेप फायदेशीर ठरतो.

६) पाने रोज खाल्याने मुखदुर्गंधी नाहीशी होऊन हिरड्या बळकट होतात. दात किडत नाहीत, जिभेवरील पांढरा थर कमी होऊन तोंड स्वच्छ व सुगंधी राहते.
७) पानाचा रस रोज चेहऱ्यावर लावला असता मुरूम, पुटकुळ्या, पांढरे डाग व चेहऱ्याची त्वचा कोरडी झाली असेल तर हे विकार कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
८) पाने सुकवून त्याचे चूर्ण आहारामध्ये वापरावे. पानांपासून बनवलेला काढा हा हाय कोलेस्टेरॉल, मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, संधिवात, आमवात हे विकार दूर करण्यासाठी नियमित प्यावा. यामुळे शरीराची पचनशक्ती सुधारून शरीरातील विषद्रव्ये लघवी व शौचावाटे बाहेर फेकली जातात.
-----------------------------------------------------------------
संपर्क ः डॉ. एकनाथ शिंदे, ९४२२९५९७५२
(अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, मालेगाव, जि. नाशिक)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com