Health Effects : विरुद्ध अन्नाच्या सेवनामुळे होणारे आरोग्यावरील दुष्परिणाम

Article by Disha Chavan : आपल्या पारंपरिक आणि आयुर्वेदिक जीवनशैलीमध्ये एकमेकांना पूरक आणि विरुद्ध अन्न याविषयी आणि आहाराविषयी अत्यंत काटेकोरपणे माहिती दिलेली आहे.
Opposite Food
Opposite FoodAgrowon

दिशा चव्हाण

Human Health Awareness : आपल्या घरामध्ये वयस्कर लोक नेहमी ‘या बरोबर हे खाऊ नकोस’ असे सांगत असतात. आपल्या पारंपरिक आणि आयुर्वेदिक जीवनशैलीमध्ये एकमेकांना पूरक आणि विरुद्ध अन्न याविषयी आणि आहाराविषयी अत्यंत काटेकोरपणे माहिती दिलेली आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये पाश्चिमात्य जीवनशैलीच्या प्रभावामुळे लोकांच्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल झालेले आहे.

त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम दिसत आहेत. जेवताना लोक कोणत्याही प्रकारचे अन्न, भाज्या किंवा फळे एकत्र एकत्र करतात. त्यामुळे पचन प्रक्रिया विस्कळीत होते, पोटात अपचन वाढते आणि अस्वस्थता येते. अनेक वेळा अशी लक्षणे आपल्याला दिसत असली तरी त्यामागील कारणे अनेक वेळा लक्षात येत नाहीत. अशा विरुद्ध अन्नपदार्थांच्या सेवनाचे परिणाम गंभीर होऊ शकतो.

Opposite Food
Human Health Awareness : आरोग्यदायी, पौष्टिक ज्वारीचा हुरडा

मांसाहारासोबत काय खाऊ नये?

मांसाहारातील प्रथिने ही अन्य अनेक पदार्थांशी जुळवून घेणारी आहेत. असे असले तरी पचनासाठी आणि आहाराच्या एकूण संतुलनासाठी पुढील अन्नासोबत मांसाहार घेऊ नये.

अ) दुग्धजन्य पदार्थ : मटण, चिकन, मासे खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये. वास्तविक, दुधात असलेले गुणधर्म हे चिकन आणि माशांच्या अगदी विरुद्ध आहेत. हे मांसाहारी पदार्थ उष्णता वाढविणारे आहेत, दूध हे थंड असते. हे या गोष्टी एकत्र खाल्ल्याने त्वचेच्या समस्या उद्‌भवू शकतात. मांसाहार केल्ल्यानंतर दही खाणे हे देखील फायदेशीर मानले जात नाही.

ब) जास्त चरबीयुक्त पदार्थ : आपल्या जेवणात चिकनच्या जोडीने तळलेले पदार्थ, जास्त सॉस आणि चीज घेतल्यास एकूणच चरबीचे प्रमाण वाढवू शकतात.

क) जास्त आम्लयुक्त पदार्थ : टोमॅटो आणि लिंबूवर्गीय फळे यांसारखे आम्ल प्रमाण जास्त असलेले पदार्थ कोंबडीचे मांस कडक आणि चिघळू शकतात.

ड) उच्च-मीठयुक्त पदार्थ : प्रक्रिया केलेले अन्न किंवा मीठ जास्त असलेल्या मसाल्यांसोबत चिकनयुक्त आहार घेतल्यास जास्त प्रमाणात मिठाचे सेवन होऊ शकते. त्यामुळे उच्च रक्तदाबासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

इ) पोटातील गॅस उत्पादक पदार्थ : काही खाद्यपदार्थ (उदा. बीन्स, मसूर आणि ब्रोकोली) हे पचन झाल्यावर गॅस (वायू) तयार करतात. ते चिकनसोबत खाल्ल्यास पोटातील गॅस वाढून अस्वस्थ वाटू शकते.

Opposite Food
Human Diet Management : आहारात असावेत तंतुमय पदार्थ

कधीच एकत्र खाऊ नयेत असे पदार्थ

दुधासोबत दही, मीठ, आंबट वस्तू, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे इ. खाणे आरोग्यासाठी हानिकारक असते.

फणस किंवा तळलेले पदार्थपण दुधासोबत खाणे हानिकारक आहेत.

दूध, दह्यासोबत फळे खाल्ल्यास कफ वाढतो. ज्यूस सेंटरवर सामान्यतः प्रत्येक फळाचा रस बनविताना दूध मिसळले जाते. अशा प्रकारे केलेल्या अनारोग्यकारक मिश्रण पिण्यामध्ये आल्यामुळे कफ वाढतो. हृदयविकारासारखे गंभीर आजारही उद्‌भवू शकतात. त्यामुळे शक्यतो फळे ही ताजी, त्यातील खाण्यायोग्य गर किंवा सालीसह खाणे कधीही चांगले.

थंड आणि गरम पदार्थ एकत्र करून खाऊ नयेत. उदा. गरम जेवणानंतर आइस्क्रीम खाणे, हे विरुद्ध आहे. चहा पिल्यानंतर थंड पाणी पिण्याची सवय अनेकांना असते. त्यामुळे त्वचा विकार होतात.

तूप आणि मध समप्रमाणात कधीही घेऊ नये, त्यामुळे पचनाचे विकार होऊ शकतात. तूप आणि मधाचा शरीरावर होणारा परिणाम वेगळा आहे. मधामध्ये उष्णता, कोरडेपणा, तर तुपामध्ये थंडावा, ओलावा देणारे गुणधर्म असतात. ज्या कारणांसाठी तूप आणि मध एकत्र सेवन करणार आहोत, त्यानुसार किंवा वैद्याच्या सल्ल्यानुसार दोन्हीपैकी एक पदार्थ जास्त प्रमाणामध्ये असावा.

उन्हाळ्यात उष्ण, तिखट, तळलेले पदार्थ खाल्यास अंगाला सूज येणे, सतत तोंड येणे, मूळव्याध होणे, अंगाला खाज येणे यासारखे विकार होऊ शकतात.

- दिशा राजेंद्र चव्हाण, ८८५६८१४६७४ (सहाय्यक प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, सोनई)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com