Health Checkup Camp : बालके, मुलांची होणार तपासणी

बालवाड्या, खासगी शाळा व खासगी कनिष्ठ महाविद्यालये तसेच शाळाबाहा १५० विद्यार्थी प्रति दिवस प्रति वैद्यकीय रुग्णालयांमध्ये पाठविले जाईल असे सांगण्यात आले.
Health Checkup
Health CheckupAgrowon
Published on
Updated on

Nagar Children Health Checkup Camp : जिल्ह्यातील शहरी व मनपा विभागातील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालके व मुलांची आरोग्य तपासणी (Health Checkup) केली जाणार आहे.

आवश्यकतेनुसार उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत (Health Department) ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ अभियान राबविण्यात येणार आहे. आतपासून (ता. ९) पुढे दोन महिने हे अभियान चालेल.

सर्व शासकीय, निमशासकीय शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, आश्रमशाळा, अंध-दिव्यांग शाळा, अंगणवाड्या, बालगृह, बालसुधार गृहे, अनाथालये, समाजकल्याण व विभाग वसतिगृहे, खासगी नर्सरी, आदिवासी भागातील बालकांच्या तपासणीकरिता जिल्हा ६०४ प्राथमिक तपासणी पथकांची स्थापना केली आहे. त्यांच्यामार्फत अधिकारी तपासणीचे नियोजन आहे.

Health Checkup
अंगणवाडीतील ३ लाख मुलांची होणार आरोग्य तपासणी

उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय (Rural Hospital), प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच नागरी आरोग्य केंद्रस्तरावर दर मंगळवार शुक्रवारी, तसेच जिल्हा रुग्णालय येथे दर शनिवारी आयोजित तपासणी शिबिरात पाठविले जाईल.

सर्व स्तर व तपासणीमध्ये उच्चस्तरीय उपचार व शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांना उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये किंवा करारबद्ध करण्यात आलेल्या खासगी रुग्णालयात होईल.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दल समिती स्थापन केले आहे. सर्व मुला-मुलींनी यात आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले याच्यासह अधिकाऱ्यांनी केले आहे.

बालवाड्या, खासगी शाळा व खासगी कनिष्ठ महाविद्यालये तसेच शाळाबाहा १५० विद्यार्थी प्रति दिवस प्रति वैद्यकीय रुग्णालयांमध्ये पाठविले जाईल असे सांगण्यात आले.

आजपासून अभियानाचा प्रारंभ

नगर जिल्ह्यातील ५ हजार ६३४ अंगणवाडी केंद्रांतील ३ लाख ८ हजार २८० बालकांची, तसेच ५ हजार १६८ शासकीय व निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील ७ लाख ६५ हजार ८७७ अशा एकूण १० लाख ७४ हजार १५७ मुलांची तपासणी केली जाईल.

९ फेब्रुवारीपासून या अभियानाचा प्रारंभ होणार आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये तपासणीचे नियोजन आहे. यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com