Sugarcane FRP Issue : ऊस दराची कोंडी फुटल्याशिवाय तोडणी नाही

Sugarcane Harvesting : स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यातील ऊस दराची कोंडी फुटल्याशिवाय ऊस तोडणी करायची नाही, असा निर्णय स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूकदार संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे.
Sugarcane Harvesting
Sugarcane HarvestingAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यातील ऊस दराची कोंडी फुटल्याशिवाय ऊस तोडणी करायची नाही, असा निर्णय स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूकदार संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे. या बाबतचे निवेदन संघटनेने प्रसिद्धीस दिले असून दराचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय ऊस हंगाम सुरू होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील ऊसतोडणी मुकादम, वाहतूक कंत्राटदार, चार चाकी सांगड मशीन, हार्वेस्टिंग ट्रक, अंगद, छकडी या सर्व वाहतूक तोडणी कंत्राटदारांनी हा निर्णय घेतला आहे. राज्यातील अनेक ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक झाली आहे. अशा मुकादमांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

Sugarcane Harvesting
Sugarcane FRP : ‘नॅचरल’कडून उसाची पहिली उचल, अंतिम दर अव्वल राहील

यातून महाराष्ट्रात अनेक गुन्हे नोंद झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली ऊस वाहतूकदारांचा लढा सुरू आहे. गतवर्षी तुटलेल्या उसाला प्रतिटन चारशे रुपये मिळावेत यासाठी श्री. शेट्टी यांनी सव्वापाचशे किलोमीटरची पदयात्रा सुरू केली आहे.

सात नोव्हेंबरला पदयात्रेचा समारोप आणि ऊस परिषद होत आहे. तुटणाऱ्या उसाला दर जाहीर होणार आहे. गतवर्षीचे चारशे रुपये व या वर्षीचा दर निश्चित केल्याशिवाय तसेच दराची कोंडी फुटल्याशिवाय ऊस तोडणी व वाहतूक करायची नाही असे बैठकीत ठरले.

गेल्या दोन वर्षात राज्यातील ऊस तोडणी वाहतूकदारांची मुकादम आणि मजुरांकडून ४९९ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ९२ कोटी तर सांगली जिल्ह्यात ७० कोटींची फसवणूक झाली आहे.

Sugarcane Harvesting
Sugarcane FRP : सोमेश्‍वर कारखान्याचा ४३० रुपयांचा अंतिम हप्ता

साखर कारखानदार व शासनाने वाहतूकदारांना न्याय देण्याची गरज असताना याकडे दुर्लक्ष केले आहे. फसवणूक झालेल्या मुकादमांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १७ टक्के वसुली झाली असून आक्रोश पदयात्रा संपेपर्यंत आणि दराचा विषय मार्गी लागेपर्यंत तोडणी आणि वाहतूक करायची नाही असे एकमुखाने ठरले.

बीड व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वाहतूकदारांनी संघटनेचा पुढील आदेश आल्याशिवाय तोडणी करू नये, असे आवाहन करण्यात आले. निवेदनावर संदीप राजोबा, संदीप मगदूम, राजाराम शिंदे, कलेश्वर वाघमोडे, तानाजी पाटील, प्रवीण शेट्टी, दिग्विजय जाधव, प्रकाश पवार, दत्तात्रय बाबर, विनोद पाटील, रावसाहेब आबदान, विद्यासागर पाटील, राजू पाटील, सीताराम वाघमारे, दीपक घोरपडे, विठ्ठल पाटील, सुनील हाळे, दादोसो उचगिरे, राजेंद्र पाटील, दीपक पाटील यांच्या सह्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com