Sugar Industry : दोनशे साखर कारखान्यांचे तोडणी, वाहतूक दर घोषित

Harvesting and Transportation Rates : राज्यातील ऊस उत्पादकांना उत्सुकता लागून असलेले ऊस तोडणी व वाहतुकीचे दर साखर आयुक्तालयाने घोषित केले आहेत.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील ऊस उत्पादकांना उत्सुकता लागून असलेले ऊस तोडणी व वाहतुकीचे दर साखर आयुक्तालयाने घोषित केले आहेत. गेल्या हंगामात २०८ पैकी ३० साखर कारखान्यांनी प्रतिटन एक हजार रुपयापेक्षा अधिक दर आकारल्याचे स्पष्ट झाले आहे.

ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ मधील कलम दोन आणि तीनमध्ये रास्त व किफायतशीर दराबाबत (एफआरपी) उल्लेख करण्यात आलेला आहे. राज्यात गेल्या गाळप हंगामात (२०२३-२४) २०८ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी केला होता. उसाची खरेदी करताना कायद्यानुसार, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष साखर कारखान्यांच्या दारात ऊस नेऊन देण्याचे बंधन आहे.

Sugar Factory
Sugar Factory : उत्तर प्रदेशात सर्वाधिक ८५ साखर कारखाने सुरू

उत्तर भारतातील शेतकरी स्वतः ऊस तोडणी व वाहतूक करीत थेट कारखान्यापर्यंत ऊस आणून देतात. महाराष्ट्रात मात्र तोडणी व वाहतूक प्रत्यक्ष शेतकरी करीत नसून कारखानेच ही कामे करतात. त्यामुळे तोडणी व वाहतुकीचा खर्च एफआरपीच्या रकमेतून कापून घेतला जातो.

काही कारखाने मात्र भरमसाठ रकमा कापतात. कोणत्या कारखान्याने नेमक्या किती रकमा कापल्या हे पूर्वी गोपनीय ठेवले जात होते. त्यामुळे शेतकऱ्यांना निर्णय घेताना अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेत साखर आयुक्तालयाने स्वतःच तोडणी व वाहतूक दर घोषित करण्याची आदर्श पद्धत सुरू केली आहे.

राज्यात गेल्या हंगामात सर्वाधिक तोडणी व वाहतूक खर्च आकारणाऱ्या पहिल्या दहा कारखान्यांमध्ये एस. जे. शुगर (रावळगाव, जि. नाशिक) हा कारखाना आघाडीवर राहिला आहे. या कारखान्याने शेतकऱ्यांच्या एफआरपीतून तोडणी व वाहतूक खर्चापोटी प्रतिटन १३३४.९८ रुपये कापून घेतले आहेत.

सर्वांत कमी तोडणी व वाहतूक खर्च आकारणारा कारखाना म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीच्या आदिनाथनगर येथील श्री वृद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या कारखान्याने तोडणी व वाहतुकीपोटी प्रतिटन केवळ १३३४.९८ रुपये कपात केली आहे.

Sugar Factory
Sugar Industry Economic Distress : साखर उद्योग आर्थिक अरिष्टात; सरकारने हस्तक्षेप करावा

साखर आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, चालू गाळप हंगामासाठी (२०२४-२५) ऊस देताना मागील तोडणी व वाहतूक दरांचा अभ्यास शेतकऱ्यांनी करावा. त्यानंतर तोडणी व वाहतुकीबाबत निर्णय घ्यावा. एखादा कारखाना भरमसाठ तोडणी व वाहतूक दर आकारत असल्यास या कारखान्याला थेट ऊस नेऊन देण्याचा अधिकार शेतकऱ्यांना आहे.

तोडणी व वाहतूक खर्च काही कारखाने जादा आकारत असल्याचा आक्षेप यापूर्वीही विविध शेतकरी संघटनांकडून घेतला गेला आहे. त्यामुळेच साखर आयुक्तालयाने खर्चाचे आकडे जाहीर केले आहे. या आकड्यांचा अभ्यास केल्यास तोडणी व वाहतूक खर्च वाजवी आहे की नाही याची खात्री करता येते. तसेच जवळच्या कारखान्यांची निवड करण्यासदेखील आयुक्तालयाने घोषित केलेली माहिती उपयुक्त ठरते.

सर्वाधिक तोडणी व वाहतूक खर्च आकारणारे पहिले दहा कारखाने

एस. जे. शुगर, रावळगाव, जि. नाशिक (१३३४.९८ रुपये प्रतिटन)

मानस अॅग्रो, उमरेड, जि. नागपूर (११९३.६३ रुपये)

भैरवनाथ शुगर, पुसद, जि. यवतमाळ (१५५९.१५ रुपये)

सोपानराव धसाळ अॅग्रो, माळकुप, पारनेर, जि. अहिल्यानगर (११०३.०१ रुपये)

संत मुक्ताई शुगर, घोडसगाव, मुक्ताईनगर, जि. जळगाव (१०९६.७९ रुपये)

श्री गजानन महाराज शुगर, कौठे मलकापूर, संगमनेर, जि. अहिल्यानगर (१०९५.९७ रुपये)

पीयूष शुगर, वाळकी, जि. अहिल्यानगर (१०८२.९७ रुपये)

व्यंकटेश्‍वर पॉवर, मौदा रामटेकरोड, मौदा, जि. नागपूर (१०७९ रुपये)

सिद्धनाथ शुगर, तिऱ्हे, उत्तर सोलापूर, जि. सोलापूर (१०७५.५५ रुपये)

बारामती अॅग्रो, शेटफळगढे, इंदापूर, जि. पुणे (१०७३.१० रुपये)

राज्यात गेल्या हंगामात कोणत्या साखर कारखान्याने ऊस तोडणी व वाहतूक खर्च नेमका किती आकारला हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना समजणे गरजेचे असते. शेतकऱ्यांच्या बिलातून कमीत कमी ऊस तोडणी व वाहतूक रक्कम वजा व्हावी यासाठी खर्चाची यादी जाहीर करण्यात आली आहे.
डॉ. कुणाल खेमनार, साखर आयुक्त

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com