Latur News: लातूर जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून ऊसतोडणीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर वाढला असून ९० ते ९५ टक्के उसाची तोडणी ऊस तोडणी यंत्राने (हार्वेस्टर) होत आहे. या यंत्रामुळे तोडणी काही तासांत होत असली त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. .हार्वेस्टरमुळे कडीकाट्याचा ऊस तसाच शिल्लक राहात असून पाचटीत मोठ्या प्रमाणात ऊस पडत आहे. हा ऊस तोडून व वेचून हार्वेस्टरमध्ये टाकण्यासाठी किंवा कारखान्याला पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना वेगळा खर्च करावा लागत आहे..Sugarcane Farming Technology: ‘एआय’ आधारित ऊसशेतीसाठी नॅचरल शुगरचा स्वतंत्र प्रकल्प.हार्वेस्टरच्या ऑपरेटरला दक्षिणा देण्यासह त्यांच्या मनपसंत भोजनासाठीही शेतकऱ्यांना खिसा खाली करावा लागत आहे. यातूनच शेतकऱ्यांना एकरी सहा ते सात हजारांचा फटका बसत असून पूर्वीची मजुरांकडून होणारी तोडणीच चांगली होती, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे..ऊसतोडणी मजुरांची दिवसेंदिवस कमी होणारी संख्या, तसेच मजुरांच्या टोळ्यांकडून कारखान्यांकडून उचल घेऊन होणारी फसवणूक, मजुरांकडून होणारी शेतकऱ्यांची अडवणूक, तोडणीसाठी लागणारा वेळ आदी प्रश्नांना उत्तर म्हणून काही वर्षांपासून तोडणीसाठी कारखान्यांकडून यंत्रांचा वापर वाढला आहे. यामुळे तोडणीसाठी शिवारात सध्या यंत्रांचाच वावर दिसून येत आहे..Sugarcane Harvester: उसाच्या फडात हार्वेस्टरचा वाढला दबदबा.मात्र, आता या यंत्रांमुळे होणारे नुकसान शेतकऱ्यांना कळून येत आहे. यंत्रांमुळे जनावरांसाठी पूर्वी उपलब्ध होणारे वाडेही (चारा) आता दुरापास्त झाल्याने दुधाचा जोडधंदा करणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. यासोबत यंत्रांमुळे शंभर टक्के उसाची तोड होत नसल्याच्याही तक्रारी शेतकरी करत आहेत. कडीकाट्याच्या एक ते दोन सरींचा ऊस तसाच शिल्लक राहत असून पाचटीच्या खाली व वरही उसाची कांडकी तशीच शिल्लक राहत आहेत..तोडणीनंतर एकरी दोन ते तीन टन ऊस वावरात निघत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पूर्वी मजुरांच्या साह्याने एकरभर ऊस तोडणीसाठी दोन दिवस लागायचे. हार्वेस्टरमुळे दोन तासांत तोडणी होत असली तरी ऊस शिल्लक राहत असल्याने व त्याच्या गाळपासाठी वेगळा खर्च व धावपळ करावी लागत असल्याने पूर्वीची मजुरांचीच तोडणी चांगली होती, असे शेतकरी बोलत आहेत..हार्वेस्टरसाठी एकरी खर्चऑपरेटरची दक्षिणा १ हजार रुपयेऑपरेटर व चालकांना मांसाहारी भोजन २ हजार रुपयेवावरात पडलेली उसाची कांडके उचलण्याची मजुरी २२०० रुपयेशिल्लक ऊस कारखान्याला घेऊन जाण्यासाठी वाहतूक खर्च १००० रुपयेएकूण ६ हजार २०० रुपये.रात्री हार्वेस्टरची तोडणी होत असल्याने कांडके वेचून ते हार्वेस्टरमध्ये टाकण्यासाठी मजूर उपलब्ध होत नाहीत. दिवसा वेचून ऊस बांधावर झाडाखाली ठेवला असून आठ दिवसांपासून कारखान्याकडून वाहन पाठवण्याचे आश्वासन दिले जात आहे. मालकतोडही दिली जात नाही. तोडणीनंतरचा वावरातील सात टन ऊस तसाच बांधावर पडून आहे.डॉ. शिवप्रकाश निजवंते, शेतकरी, हडोळती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.