Farm Labour Shortage: सुगी आली तोंडावर, मजूर मिळेनात बांधावर
Paddy Harvest: पावसानंतर भात कापणीचा हंगाम वेग घेत असताना ग्रामीण भागात मजुरांची जबरदस्त टंचाई जाणवत आहे. शेतात अजूनही ओलावा असल्याने यंत्रांनी कापणी करणे कठीण ठरत असून शेतकऱ्यांना कापणी-मळणीसाठी मजूर मिळत नाहीत.