Raju Shetti: कसदार लेखन ग्रामीण साहित्यात आणावे लागेल : राजू शेट्टी

Murtizapur Farmer Event: मूर्तिजापूर (अकोला) येथे चौथ्या शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन संपन्न झाले. या वेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी ग्रामीण साहित्यात शेतकऱ्यांच्या समस्या ठळकपणे मांडल्या जाव्यात, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
Raju Shetti
Raju ShettiAgrowon
Published on
Updated on

Akola News: कसदार लेखन ग्रामीण साहित्यात यावे लागेल. त्यातून शेतकऱ्यांच्या जगण्याचे प्रश्न, त्याच्या समस्या, अडचणी उमटल्या पाहिजेत, अशी अपेक्षा शेतकरी नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.

मूर्तिजापूर (जि. अकोला) येथे संत पुंडलिक महाराज यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित चौथ्या शेतकरी साहित्य संमेलनात अध्यक्ष म्हणून श्री. शेट्टी बोलत होते. या वेळी जनमंचचे (नागपूर) अध्यक्ष राजीव जगताप यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे, संस्थानचे अध्यक्ष विठ्ठलराव पातोंड, स्वागताध्यक्ष माधवराव काळे, शेतकरी मंचाचे प्रमुख राजू वानखेडे आदी उपस्थित होते.

Raju Shetti
Raju Shetty Shaktipeeth : शक्तिपीठमधून सरकारमधील दलाल नेत्यांना ५० हजार कोटी; राजू शेट्टी यांचा सरकारवर गंभीर आरोप

सकाळी ग्रंथ व शेती अवजारे दिंडीने साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. संमेलनात अनेक मान्यवरांचा गौरव होणार असून, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रातील सेवेत मोठे योगदान देणारे स्टेट बँकेचे माजी अधिकारी रमेशचंद्र कुर्मी यांना पहिल्या आंतरभारती स्नेहसंवर्धन पुरस्काराने, दै. ‘सकाळ-ॲग्रोवन’चे अकोला जिल्हा प्रतिनिधी गोपाल हागे यांना ‘जनमंच पत्रकारिता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबरोबरच तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी डिगांबर जाधव (लाईत) व रोहन फुके (रामखेड) या दोन शेतकऱ्यांना ‘जनमंच शेतकरी प्रेरणा’ पुरस्कार देण्यात आला.

श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘आज शेतकऱ्याला प्रगत तंत्रज्ञान दिले जात नाही, त्याला मिळणारे अनुदान हे इतर देशांच्या तुलनेत अत्यल्प आहे. अशा परिस्थितीत त्याला स्पर्धा करण्याचे आवाहन आपली सरकारे करतात.

Raju Shetti
Raju Shetti: ऊस तोडणी मुकादमांकडील वसुलीबाबत कार्यवाही करावी

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर लोकसभा, विधानसभा तसेच विधान परिषदेत आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी चकार शब्दही काढत नाहीत. वर्षानुवर्षे आपला शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. या देशात मोजक्या धनाढ्यांना पोषक धोरणे राबवली जात आहेत. सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कर्जमुक्तीचे आश्वासन दिले मात्र आज ते पाळले जात नाही.’’

उद्‍घाटनपर भाषणात राजीव जगताप म्हणाले, की विदर्भातील १२३ प्रकल्प पूर्ण न झाल्याने दहा लाख हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित राहिली आहे. विदर्भातील सिंचन अनुशेष राजकीय अनास्थेमुळे कायम रेंगाळत चालला आहे. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजू वानखडे यांनी केले. स्वागताध्यक्ष माधवराव काळे यांनी साहित्य संमेलन, कृषी प्रदर्शनाचा आढावा घेतला. सूत्रसंचालन प्रा. सुधाकर गौरखेडे यांनी केले. आभार प्रमोद राजनदेकर यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com