Mango Festival : आंबा महोत्सवातील हापूस, केसरला ग्राहकांची पसंती

Mango Season : छत्रपती संभाजीनगर शहरातील जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २७ मेपासून आंबा महोत्सवाला सुरुवात झाली.
Mango Festival
Mango FestivalAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Mango News : छत्रपती संभाजीनगर शहरातील जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २७ मेपासून आंबा महोत्सवाला सुरुवात झाली. या महोत्सवात जवळपास २६ स्टॉलच्या माध्यमातून केसर व हापूस आंबा उत्पादक सहभागी झाले होते. हापूस उत्पादक २०, तर केसर उत्पादक ६ होते.

Mango Festival
Gavran Mango : पुणे जिल्ह्यातील गावरान आंब्याची ग्राहकांना प्रतीक्षा

कोकणातील हापूसच्या जवळपास १८०० पेट्या, तर मराठवाड्यातील केसर जवळपास तीन टन विक्रीसाठी उपलब्ध झाला होता. २८ मेपर्यंत हापूसच्या ९०० पेट्या, तर केसर ५० क्विंटल विक्री झाला.

हापूसला ३०० ते ७०० रुपये डझन, तर २००० ते २५०० रुपये पेटी प्रमाणे दर मिळत आहे. केसर आंब्याला १०० ते १५० रुपये प्रतिकिलो प्रमाणे, तर कच्च्या केसरला ८० ते १०० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. आज (ता. ३१) आंबा महोत्सवाचा समारोप होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com