Farmers Crisis: हवामान बदलाच्या संकटामुळे यंदा हापूससह आंब्याचे उत्पादन ८० टक्क्यांपर्यंत घटले आहे, असा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. अशा परिस्थितीत आंबा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना, ग्राहकांना अस्सल कोकण हापूस उपलब्ध व्हावा, तसेच त्यातील भेसळ रोखण्यासाठी पुणे बाजार समिती प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. .आंबा नुकसान आणि विक्री संदर्भात बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.९) आयोजित बाजार समिती प्रशासन आणि आंबा अडतदारांच्या बैठकीत शेट्टी बोलत होते. या वेळी रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने, बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, सचिव राजाराम धोंडकर, संचालक गणेश घुले, अनिरुद्ध भोसले, सुदर्शन चौधरी, संतोष नांगरे, आंबा अडतदार करण जाधव, संदीप खैरे, सौरभ कुंजीर, नितीन कुंजीर, सिद्घार्थ खैरे आदी उपस्थित होते..Hapus Mango Fraud: हापूसच्या नावाने फसवणूक.या वेळी शेट्टी म्हणाले,‘‘आंबा उत्पादन केवळ ५ टक्के आहे. अशातच शेतकऱ्यांना बागा वाचविण्यासाठी निविष्ठांवर मोठा खर्च केला आहे. हा खर्च निघणे सुद्धा मुश्कील झाले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी बाजार समित्या आणि अडतदारांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. .Hapus Mango Price: हापूसला पाच ते सात हजार रुपये दर.यासाठी कोकण हापूसमधील भेसळ रोखणे गरजेचे आहे. यातून चांगले दर मिळावेत असा प्रयत्न व्हावा. ज्यांना स्वस्त पाहिजे त्यांनी केरळ, कर्नाटक, गुजरातचा आंबा }खावा.’’.या वेळी बाजार समिती सचिव धोंडकर म्हणाले, ‘‘कोकण हापूसमध्ये भेसळ रोखण्यासाठी बाजार समिती दर वर्षी कडक उपाययोजना करते. यासाठी कर्नाटक आंबा विक्रीसाठी बाजार आवाराबाहेर स्वतंत्र विभाग केला आहे. तसेच बनावट आंबा विक्री रोखण्यासाठी भरारी पथके केली आहेत. तर शेतकऱ्यांनी मागणी केल्यास त्यांना थेट विक्रीसाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.