Happy Mind : मन करा रे प्रसन्न

आनंद ही अशी मानसिक अवस्था आहे की या अवस्थेचा सरळ सरळ संबंध आपल्या आरोग्याशी जोडलेला असतो.
Happy Mind : मन करा रे प्रसन्न
Published on
Updated on

आनंद ही अशी मानसिक अवस्था (Mental Condition) आहे की या अवस्थेचा सरळ सरळ संबंध आपल्या आरोग्याशी (Health) जोडलेला असतो. आपण जेव्हा जास्तीत जास्त आनंदी असू त्या वेळी आपले आरोग्य उत्तम असते. आरोग्य उत्तम असेल तर आनंदी असायला कोणतेही वेगळे कारण शोधायची गरज नसते. मात्र अमुक गोष्ट मिळाल्या नंतरच मला आनंद होईल अशी मानसिकता जर आपण ठेवली तर ती गोष्ट मिळवण्याची अवास्तव ओढ दुःखाला कारणीभूत होते.

शरीराने निरोगी असून सुद्धा जर मनाचे आरोग्य बिघडले तर त्याचा आपल्या शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. आयुष्यभर आपण बाह्य जगात आनंद शोधण्याचा कितीही प्रयत्न केला तरी खरा आनंद म्हणजे आपले निरोगी धडधाकट शरीर यातच सामावलेला असतो.

सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा ज्याच्या पायाशी लोळण घेत असतील असा धनाढ्य व्यक्ती, जर आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेला असेल किंवा डॉक्टरांनी त्याला अनेक पथ्ये पाळायला सांगितली असतील, तर समोर दिसत असणाऱ्या अनेक सुखसुविधांचा तो उपभोग घेऊ शकत नाही. क्षणोक्षणी तो आपल्या नशिबाला दोष देत आणखी दुःखी होत असतो.

Happy Mind : मन करा रे प्रसन्न
Farmer Incentive Scheme : पन्नास हजार शेतकरी‘प्रोत्साहन’च्या प्रतीक्षेत

लुळ्या-पांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी असे म्हणतात याचा अर्थ गरिबी भूषणावह अजिबात नाही.आयुष्यात पैशाला खूप महत्त्व आहे. पैशाने अनेक सुखसुविधा विकत घेता येतात. परंतु पैसे मिळवण्याच्या अतिहव्यासाने अनेक जण स्वतःचे आरोग्य गमावून बसतात. निरोगी शरीर ही जगातील सर्वांत मोठी संपत्ती आहे. सकाळी झोपेतून जागे होताना आज मला कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहायचे आहे,

असे जर रोज स्वतःला बजावले तर आनंदी राहायची सवय लागून जाईल. आनंदी राहण्याच्या सवयी पाठोपाठ सकारात्मक विचारसरणीला आपोआप चालना मिळत जाते. समोर कोणतीही आपत्ती किंवा दुःखदायक घटना घडली तरी निराश होऊन कोसळून न जाता, त्यावर सकारात्मक उपाय शोधले जातात.

Happy Mind : मन करा रे प्रसन्न
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

मनाविरुद्ध घडत असलेल्या गोष्टींना आव्हान म्हणून बघितले तर आयुष्यातली रंजकता आणखी वाढत जाते. मनाचे आरोग्य चांगले ठेवले तर अनेक दुष्प्रभ आजारावर मात केल्याची अनेक उदाहरणे आहेत. लहान मूल खूप आनंदी असते.

ते झोपेत सुद्धा खुदकन हसते. ते हास्य मिळवण्यासाठी त्याने कोणतीही उठाठेव केलेली नसते. किरकोळ गोष्टीवरून आपली चिडचिड होण्याऐवजी अगदी क्षुल्लक गोष्टींमुळे आपल्याला आनंदी कसे होता येईल याचा प्रयत्न सतत करायला हवा. तुकाराम महाराज म्हणतात.

मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे कारण।।

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com