संजय मांगोरे केळोशी बुद्रुक, ता. राधानगरी, जि. कोल्हापूरRural Lifestyle: धामोडच्या तुळशी धरण जलाशयाच्या पार मागं पाणलोट क्षेत्रातल्या घाटमाथ्यावर केळोशी हे निसर्गरम्य गाव. केळोशीच्या एका बगलेच्या छोट्या डोंगर उतारावर माळवाडी वसली आहे..या चढ-उतार आणि नागमोडी रस्त्याच्या प्रवासात माझी जिज्ञासा प्रचंड तीव्र होती. कारण त्या माणसाबरोबर पहिल्या फोनवरच्या बोलण्यापासूनच माझं त्याच्या बद्दलचं कतूहल निर्माण झालं. कसा असेल हा माणूस? तो केवळ अर्ध्या एकर शेतीच्या तुकड्यावर नेटका प्रपंच कसा चालवतोय? बरं त्याच्या आत्मविश्वासावर शंका घ्यायला जागा नाही इतकी तो आपली अचंबित जीवनशैली विनम्रतेने सांगत होता. त्यात प्रामाणिकपणाचा गंध जाणवत होता. फोन संपवत मी त्याला म्हणालो, की आपण प्रत्यक्ष भेटूया. कारण तुमच्यासारख्यांच्या उदाहरणांचीच वाणवा आहे जगात. आणि याची गरज पण आहे सध्या, असो. लवकरच गावी येईन. भेटू. फोन कटला, पण त्याचे विचार काही मनातून हटत नव्हते..Agrowon Diwali Article: माळरानावर रुजविले हिरवाईचे स्वप्न....मला या व्यक्तीसंबंधी बऱ्याच बाबतीत कुतूहल वाटत होतं. या माणसाला रोज पहाटे तीन वाजून छत्तीस मिनिटांनी गजर न लावता जाग येते. उठल्या उठल्या घरातल्यांच्या अंघोळीसाठी पाण्याचा बंब तापवण्यापासून स्वतःची प्रातःकालीन आन्हिके आवरून घर परिसराची स्वच्छता करेपर्यंत पूर्व दिशेला लाली येत जाते. आरोग्याबद्दल तो खूप सजग आहे. तो टूथपेस्ट, ब्रश वापरत नाही. स्वत:चे दंतमंजन स्वतः तयार करतो. ज्यामध्ये हिरडा, बेहडा, लवंग इत्यादी दळून त्याची पावडर करतो. त्यात सैंधव मीठ घालतो. सकाळी फक्त एकदाच तुळस, गवती, पेरूची पानं टाकून उकळलेला गुळाचा काळा चहा पितो. शेविंग क्रीम अथवा साबण असली चैन नाही. दुधाने दाढी करतो. अंगाला साबण लावत नाही. .Agrowon Diwali Article: शेतीनं तारलंच नव्हे, तर उभं केलं....कधीच फॅनचा वारा घेत नाही. उजाडल्यावर आठ किलोमीटर चालतो. जवळच्या धरणाच्या जलाशयात एक किलोमीटर पोहतो. सकाळी बरोबर साडेआठला जेवायला बसतो. मग नंतर शेतीची कामे. दुपारी तो झोपत नाही. बाकीचा कार्यक्रम आता मी त्याच्या घरी जाऊन जाणून घेणार आहे. आता इतक्यातच त्याचं घर येईल. निवांत अशा सिंगल रस्त्यावरून मी चाललो आहे. या रस्त्याच्या वळणावळणाने माझे मन आनंदाने झुलत आहे. सगळा परिसर नुकत्याच सरलेल्या पावसाने गर्द हिरवा आहे. समोरच्या प्रत्येक डोंगरावर परतीच्या पावसाचे ढग जणू ॲक्शन मोड घेण्याच्या संकेताची वाट पाहत आहेत. .जरा अंतर गेलो तेव्हा डाव्या बाजूला माळवाडीकडे असा निर्देश केलेली पाटी दिसते आणि मी संजय मांगोरे या अवलियाच्या गावात आल्याचे लक्षात येते. ती छोटीशी वाडी आहे. एकुलत्या गल्लीच्या कोपऱ्यावर नुकत्याच गेलेल्या गणपती बप्पाचा रिकामा मंडप अजूनही आहे. जिथे असलेल्या डिजिटल बोर्डवर संजयचा फोटो दिसतो. या वर्षीच्या श्रींच्या मूर्तीचे मानकरी मा. श्री. संजय विष्णू मांगोरे...!.त्या शांत गल्लीतल्या टळटळीत दुपारी बाहेर वाहनाची चाहूल लागल्याने तिथल्याच एका घरातून स्वतः संजय नमस्कार करत सामोरा येतो. अंगणात आगतस्वागत होतं. पायावर थंड पाणी घेऊन मी त्याच्या घरात बसता होतो. घरात सगळं जिथल्या तिथं. स्वच्छ. टापटीप. आशेचा पहिला संकेत.(संपूर्ण लेख वाचा २०२6 च्या ॲग्रोवन दिवाळी अंकात).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.