Rain Damage Compensation: मालेगावसह परिसरात मार्च अखेरीस गारपीट व अवकाळी पावसात काढणीला आलेल्या कांदा, गहू, मका, भाजीपाला, टरबूज, खरबूज यासह पिकांचे नुकसान झाले. यात बागायतदार शेतकऱ्यांना नुकसानीचे सुमारे १७ हजार तर फळपिकांना साडेबावीस हजार हेक्टरने नुकसान भरपाईचा अहवाल दिला आहे. तालुक्यातील साडेनऊ शेतकरी बाधित आहेत. यासाठी अंदाजे १० कोटी रुपये दिले आहेत..मालेगाव तालुक्यात ४९ गावांमध्ये गारपीट मोठ्या प्रमाणात काढणीस आलेल्या कांद्याचे नुकसान झाले. गारांमुळे शेतकऱ्यांचे टरबूज, खरबूज यासह लिंबू, आंबा, पपई, डाळिंब यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यासाठी महसूल व कृषी विभागाने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात पंचनामे करून शासनाला अहवाल दिला आहे. .Crop Damage Compensation: मार्चमधील नुकसानीपोटी २५ कोटी भरपाईचा प्रस्ताव.मे महिन्यात शेतकऱ्यांच्या शेतीच्या मशागतीची कामे सुरु होतात. १५ मे पूर्वी शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित करावे. काही भागात २५ मे नंतर कापूस लागवड केली जाते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या पैशांतून बि-बियाणे तसेच नांगरणी, वखरणी, कचरा वेचणे या विविध कामांसाठी थोडीफार मदत होणार आहे..Crop Damage Compensation: तातडीने पंचनामे करून मदत द्या : मुख्यमंत्री फडणवीस.शासनाने याचा विचार करावा. लवकरात लवकर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकावेत. मालेगाव परिसरात सुमारे ९ हजार ५६४ शेतकरी गारपीट व अवकाळी पावसामुळे त्रस्त झाले होते. यात ४९ गावांची निवड केली हाेती. .तालुक्यात ३ हजार ७०० हेक्टर कांद्याचे नुकसान झाले आहे तर १२०० हेक्टरवर डाळिंबाचे नुकसान झाले असून शासनाकडून मिळणारी रक्कम ही नुकसानीच्या तुलनेने अत्यंत तोकडी आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.