डॉ.श्रुतिका देवआपल्या पारंपरिक आहार संस्कृतीत अनेक औषधी आणि पौष्टिक वनस्पतींचा समावेश आहे. त्यांपैकी हदगा (सेसबानिया ग्रँडिफ्लोरा) ही महत्त्वाची वनस्पती. हदग्याची फुले शुभ्र पांढरी,लाल, गुलाबी रंगाची आणि मऊ असतात. या वनस्पतीमध्ये पचनसंवर्धक, रक्तशुद्धीकारक तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे गुणधर्म आहेत. या फुलांमध्ये नैसर्गिकरित्या अँटीऑक्सिडंट, अँटिमायक्रोबियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीकार्सिनोजेनिक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. .या फुलांमध्ये अँटीऑक्सिडंट घटक जसे, की फ्लॅव्होनॉइड्स, फेनोलिक संयुगे आणि जीवनसत्त्व क असते. शरीरातील फ्री रॅडिकल्स नियंत्रितकरून ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात. हे घटक पेशींचे संरक्षण करून वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावण्यास, त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास आणि हृदयविकार तसेच दीर्घकालीन आजारांपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहेत..हादग्याची लागवड कशी करावी | Hadga Fodder for Goat Farming | ॲग्रोवन.फुलांमध्ये असलेले अँटिमायक्रोबियल गुणधर्म विविध जीवाणू, बुरशी आणि रोगकारक सूक्ष्मजंतूंवर प्रभावीपणे कार्य करतात. फुलांमधील जैव सक्रिय संयुगे सूक्ष्मजीवांच्या वाढीला प्रतिबंध करतात. शरीरातील संक्रमणांपासून नैसर्गिक संरक्षण देतात. त्यामुळे ही उत्पादने चवीला उत्तम,सुरक्षित आणि कार्यक्षम आरोग्यवर्धक पर्याय ठरतात. हदग्याचे औषधी व पोषक गुणधर्म लक्षात घेऊन अन्नतंत्र विभागातील बी.टेक विद्यार्थी वैष्णवी मुंढे, ओमकार वडगावकर, ऋषिकेश मुसळे यांनी प्रायोगिक तत्त्वावर हादगा फुलांपासून सूप प्रीमिक्स तयार केले आहे..निर्मिती प्रक्रियाहदग्याची ताजी फुले हाताने गोळा करून स्वच्छ पाण्याने नीट धुवावीत. त्यानंतर १० टक्के सोडियम कार्बोनेट द्रावणात प्रक्रिया करावी. यामुळे त्यांच्या रंग, सुगंध आणि पोषक गुणधर्मांचे संवर्धन होते. ही प्रक्रिया नैसर्गिक रंग आणि जैवसक्रिय संयुगे स्थिर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते..खरिपात करा या चारापिकांची लागवड .फुले सावलीत वाळवून सुमारे १० टक्के स्थिर आर्द्रता येईपर्यंत कोरडी करावीत. त्यानंतर बारीक पूड स्वरूपात दळावी. तयार झालेली पावडर मूग डाळ, हरभरा डाळ आणि उडीद डाळीपासून तयार केलेल्या सूप प्रीमिक्समध्ये मिसळावीत. या सूपमध्ये काळी मिरी, जिरे, आले, लसूण, धने पूड आणि मीठ यांसारख्या नैसर्गिक मसाल्यांचा वापर करण्यात केला आहे. कोणतेही कृत्रिम संरक्षक वापरलेले नाहीत. १० ग्रॅम सूप प्रिमिक्स पावडर,१०० मिलि पाण्यामध्ये साधारणपणे २ ते ३ मिनिटे एक उकळी येईपर्यंत शिजवून आहारात वापरता येते..सूप प्रीमिक्सच्या पोषणमूल्य परीक्षणात असे दिसले, की त्यामध्ये लक्षणीय प्रमाणात अँटीऑक्सिडंट घटक, फिनोलिक व फ्लॅव्होनॉइड संयुगे तसेच जीवनसत्त्व क आणि ब दिसून आले. त्यासोबतच लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व झिंकसारखी आवश्यक खनिजे मुबलक प्रमाणात आहेत. या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामामुळे चांगली चव मिळते. तसेच शरीराची नैसर्गिक संरक्षणक्षमता बळकट करण्यास मदत करते..फुलांतील सक्रिय पोषक द्रव्ये फ्री रॅडिकल्समुळे होणारे पेशींचे नुकसान कमी करून त्वचा, यकृत व इतर उतींच्या आरोग्याचे रक्षण करतात.डाळींतील उच्च-प्रथिनांमुळे सूप प्रीमिक्सचे अमिनो अॅसिड प्रोफाईल सुधारते. त्यांची जैवउपलब्धता वाढते, ज्यामुळे पीसीएम कमी करण्यासाठी एक प्रभावी पूरक आहार आहे. स्थानिक पातळीवर हदग्याच्या फुलांचा मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योग शक्य आहे.- डॉ.श्रुतिका देव ९९६०४८९५९९(साहाय्यक प्राध्यापक,इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजी, एमजीएम युनिव्हर्सिटी, छत्रपती संभाजीनगर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.