Agrowon Diwali Article: चविष्ट आणि पौष्टिक पर्याय देणारा ‘न्यूट्रिसम’
Gyanam Nutrigo: चव हवी, पौष्टिकता हवी, पदार्थ परिचित असावा, त्याची उपलब्धता हवी आणि किंमतही परवडेल अशी हवी. असे सगळे गुण असलेल्या पदार्थांची बाजारातील उणीव नेमकी हेरून, ती भरून काढण्यासाठी ज्ञानम न्यूट्रिगो प्रायव्हेट लिमिटेड ही स्टार्टअप कंपनी सुरू करण्यात आली. वेगळ्या विचारातून सुरू झालेल्या या कंपनीचा प्रवास रंजक आहे.