गुजरातमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज जाहीरशेतकऱ्यांसाठी ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी मदतप्रत्येक शतकऱ्याला प्रति हेक्टरी २२ हजार रुपये जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत भरपाई मिळणार .Gujarat Farmer Relief Package: गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शुक्रवारी (दि. ७) राज्यात अतिवृष्टीने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली. शेतकऱ्यांसाठीचे हे राज्यातील आतापर्यंतचे सर्वात मोठे पॅकेज आहे..मुख्यमंत्री पटेल यांच्यासह इतर मंत्र्यांनी बाधित जिल्ह्यांना भेट देऊन पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी पीक नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली, असे सरकारने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. अतिवृष्टीनंतर, राज्य सरकारकडून बाधित क्षेत्रांत पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ३३ जिल्ह्यांच्या २५१ तालुक्यांतील १६,५०० हून अधिक गावांत हे सर्वेक्षण करण्यात आले. यात ५,१०० सर्वेक्षण पथकांचा सहभाग होता..Rain Crop Damage: पावसाने उद्ध्वस्त शेतकऱ्यांची थट्टा.मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात गेल्या दोन दशकांत कधीही न पाहिलेला असा पाऊस पडला. यामुळे अनेक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले..Paddy Crop Loss: धानपट्ट्यात ७७ हजार हेक्टरला फटका; अर्थकारण बिघडले.सरकारच्या मदत पॅकेजमधून सिंचित आणि सिंचनाखाली नसलेल्या पिकांसाठी एकसमान भरपाई दिली जाणार आहे. ही भरपाई प्रति हेक्टर २२ हजार रुपये, प्रति शेतकरी जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. .गुजरात सरकारने २० ऑक्टोबर रोजी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांसाठी ९४७ कोटी रुपयांचे आर्थिक मदत पॅकेज जाहीर केले होते. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये जाहीर केलेले पॅकेज नवीन पॅकेजमध्ये समाविष्ट केले जाणार नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही..या भरपाई व्यतिरिक्त, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे की, ९ नोव्हेंबरपासून राज्य सरकार शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीत ( MSP) शेंगदाणे, मूग, उडीद आणि सोयाबीनची खरेदी सुरू करेल. ही शेतमालाची खरेदी सुमारे १५ हजार कोटींची असेल. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.