Sand Mining Movement
Sand Mining MovementAgrowon

Sand Mining : वाळू उपशाकडे लक्ष वेधण्यासाठी चंद्रभागेच्या खड्ड्यात उभारली गुढी

Sand Mining Movement : महर्षी वाल्मीकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव व सहकाऱ्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात अवैध वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी याच खड्ड्यात गुढी उभारून अनोखे आंदोलन केले.
Published on

Pandharpur News : गुढी पाडव्याच्या दिवशी महर्षी वाल्मीकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव व सहकाऱ्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात अवैध वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी याच खड्ड्यात गुढी उभारून अनोखे आंदोलन केले. या वेळी अवैध वाळू उपशाकडं दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासून महर्षी वाल्मीकी संघाच्या वतीने गणेश अंकुशराव व त्यांचे कार्यकर्ते आवाज उठवत आहेत, यासाठी त्यांनी विविध लक्षवेधी आंदोलनं सुद्धा केली. आजही त्यांनी हटके आंदोलन करत प्रशासनाचे या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पंढरपूरचे तत्कालीन तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी अवैध वाळू उपशाकडं अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप करत अंकुशराव यांनी त्यांच्या बदलीची मागणी लावुन धरली होती.

Sand Mining Movement
Sand Excavation : गिरणा-मोसमचा बेकायदेशीर वाळू उपसा थांबता थांबेना

त्यानंतर सदर दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, नवीन अधिकारी आले. या वेळी बोलताना अंकुशराव म्हणाले, की आम्ही अवैध वाळू उपशाविरुद्ध विविध आंदोलनं करुनही वाळू उपसा थांबत नाही, मागील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी केली, ते गेले, नवीन आले परंतु नवीन आलेले अधिकारी सुद्धा या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्यासारखेच आहेत की काय, असा प्रश्‍न पडलाय.

Sand Mining Movement
Illegal Sand Mining : सोलापूर जिल्ह्यात बेकायदा वाळू उपसा सुरू

अवैध वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या अस्तित्वाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झालाय, चंद्रभागेच्या पात्राचा आकार बदललाय, अनेक मोठमोठ्या खड्ड्यात बुडून अनेक निष्पाप भाविकांचा बळी गेलाय, चंद्रभागेची अवस्था बकाल बनलीय. त्यामुळे या प्रश्‍नाकडे शासनाने गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. आता तरी शासनाने नवीन आलेल्या प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना याची दखल घेण्याचे आदेश देऊन अवैध वाळू उपसा करणारांविरुद्ध कडक आणि सातत्याने कारवाई करण्याचे आदेश द्यावेत.

जर अशी कारवाई झाली नाही तर आम्ही पुढील काळात लोकशाही मार्गाने आणखी तीव्र आंदोलने करू, असा इशाराही त्यांनी दिला. या वेळी नीलेश माने, अरविंद नाईकवाडी, महावीर अभंगराव, सूरज कांबळे, माउलीभाऊ कोळी, प्रकाश मगर, समाधान कोळी, दत्तात्रय कांबळे, पांगळ्या सुरवसे, भैया अभंगराव, अप्पा करकमकर, अविनाश नाईकनवरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com