Satara News: बलशाली भारताच्या निर्मितीसाठी गेल्या दहा वर्षांत अत्यंत शिस्तबद्ध प्रयत्न करून आमूलाग्र बदल घडवून आणण्यात आले आहेत. जागतिक पातळीवर आपल्या देशाचे नाव अभिमानाने घेतले जाईल, अशी कामगिरी सर्वच क्षेत्रात सुरू आहे. ही आपल्या सर्वांसाठीच अत्यंत अभिमानाची बाब आहे. देशात, महाराष्ट्र राज्य आणि सातारा जिल्ह्याची परंपरा अधिक उज्वल करण्यासाठी सर्वच जिल्हावासियांनी एकत्र येऊन योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले..येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. ध्वजवंदनानंतर पोलिस विभागाच्या वतीने मानवंदना दिली..Satara Nagarapalika Result: सातारा जिल्ह्यातील सात नगरपालिकांत भाजपचे वर्चस्व.या सोहळ्यास जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक तुषार देाशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अपर जिल्हाधिकारी वैशाली कडूकर आदी उपस्थित होते..Satara District Bank: सातारा जिल्हा बॅंकेचे कामकाज उल्लेखनीय : बाबासाहेब पाटील.सातारा जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सिंचनाच्याबाबतीत आपला जिल्हा अधिक पुढे आहे, बंदिस्त पाईपलाईनद्वारे सिंचना क्षमता वाढविण्यात येत असून अधिक क्षेत्राला पाणी देणे सोपे होणार आहे. जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र खूप मोठे आहे क्षेत्रात अधिक उत्पन्न मिळण्यासाठी आधुनिक एआय तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार असल्याचेही श्री. देसाई यांनी सांगितले..परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येत आहे. राज्यातील औद्योगीक क्षेत्र वाढवून जास्तीत जास्त तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर आहे. देशाच्या आर्थिक व कृषी क्षेत्रात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे. तसेच राज्याचा प्रगतीत सातारा जिल्ह्याचे योगदान मोठे आहे. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन काम करीत आहे. यामध्ये स्वयंसेवी संस्था, तरुण, नागरिक यांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहनही श्री. देसाई यांनी केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.