Soybean Market : नगर जिल्ह्यात सात ठिकाणी हमीभाव केंद्रे सुरू होणार

Mung Rate : सोयाबीन, मूग, उडदाची होणार खरेदी
Soybean Market
Soybean MarketAgrowon
Published on
Updated on

Nagar News : नगर ः मूग, उडदाची बाजारात आवक होत असून हमी दरापेक्षा कमी दराने खरेदी केली जात आहे. त्यामुळे हमीदराने खरेदी करण्यासाठी नगर जिल्ह्यातील सात केंद्रावर मूग, उडीद, सोयाबीनची खरेदी होणार आहे. आठवडाभराच्या आत ही केंद्रे सुरू होणार असल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशकडून सांगण्यात आले. नगर जिल्ह्यात यंदा मुगाची ५०,१३२ हेक्टरवर, सोयाबीनची १ लाख ७० हजार हेक्टरवर तर उडदाची ६४,१७४ हेक्टरवर पेरणी झाली होती.

यंदा पंधरा दिवस आधीच मूग, उडदाची बाजारात आवक सुरू झाली. मात्र मुगाला दर्जा नसल्याचे सांगत हमी दरापेक्षा कमी दराने बाजारात व्यापारी खरेदी करत असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे किमान हमी दराने खरेदी व्हावी यासाठी ‘नाफेड’कडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत हमी केंद्रे सुरू केली जात आहेत. नगर जिल्ह्यात कर्जत, कोपरगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, पारनेर, राहुरी, शेवगाव या सात ठिकाणी ही केंदे सुरू करण्याला मान्यता दिली आहे. साधारण आठवडा भरात ही केंद्रे सुरू होत असल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून सांगण्यात आले.

Soybean Market
Farmer Demand : सोयाबीन हमीभाव केंद्रे सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी

मुगाला ८६८२ रुपये, उडदाला ७ हजार ४०० रुपये व सोयाबीनला ४८९२ रुपये हमी दर आहे. सध्या बाजारात मुगाला ६५०० ते ७८०० व सरासरी ७१५० रुपये, उडदाला ६ ते ७ हजार व सरासरी ६५०० तर सोयाबीनला ४४०० ते ४५०० व सरासरी ४४५० रुपये दर मिळत आहे. हमी केंद्रे सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र केंद्रे सुरू करण्याबाबत अजून ‘नाफेड’कडून मार्गदर्शन सूचना आल्या नाहीत, असे सांगण्यात आले.

विक्री संपत आल्यावर केंद्रे नगर जिल्ह्यात मूग, उडदाची काढणी जवळपास उरकली असून सोयाबीन काढणीला सुरुवात होत आहे. मूग, उडदाचे काही प्रमाणात सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे उत्पादकता घटली आहे. पंधरा दिवसांपासून बाजारात मूग, उडदाची आवक होत असून दर्जा नसल्याचे कारण पुढे करत हमीदरापेक्षा कमी दराने खरेदी केली जात आहे. पंधरा दिवसांपासून आवक होत असल्याने बऱ्यापैकी विक्री उरकली आहे. आता विक्री उरकत आल्यावर हमी केंद्रे सुरू केली जात असल्याचे शेतकरी बोलत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com