ठळक मुद्देदुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी सुधारणांमुळे ग्राहकांसह दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळालाआता दूध स्वस्त होणार असल्याची शक्यता व्यक्तयावर अमूल आणि गोकुळ दूध संघाकडून भूमिका स्पष्टयूएचटी आणि तूप दरात होणार बदल .Dudh Dar : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) सुधारणांमुळे दूध विक्री दरात कपात होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर अमूल आणि गोकुळ दूध संघाने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. २२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या जीएसटी बदलांचा पिशवीतील दूध दरावर कोणताही परिणाम होणार नाही, असे अमूलने स्पष्ट केले आहे..देशातील सर्वात लोकप्रिय डेअरी ब्रँड असलेल्या अमूलकडून सांगण्यात आले आहे की, २२ सप्टेंबरपासून पाकिटमधील दूध विक्री दरात कोणतीही कपात केली जाणार नाही. कारण आधीपासून पिशवीतील दूध जीएसटीमुक्त आहे..Interview with Jayen Mehta: गुजरातबाहेरील शेतकरीही ‘अमूल’सोबत जोडणार.३ सप्टेंबर रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटीमधील नवीन सुधारणांची घोषणा केली. लोकांच्या राहणीमानाचा खर्च कमी करणे आणि आर्थिक उलाढालींना चालना देण्याच्या उद्देशाने ही एक ऐतिहासिक सुधारणा असल्याचे सीतारामन यांनी म्हटले. जीएसटी दर कपातीमुळे कुटुंबे, शेतकरी, व्यवसाय आणि आरोग्यसेवा क्षेत्राला लाभ होईल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी दरांतील सुधारणांमुळे ग्राहकांसह दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला..या पार्श्वभूमीवर, अमूल उत्पादने मार्केटिंग करणाऱ्या गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) चे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे की, "पिशवीतील ताज्या दूध दरात बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. कारण पिशवीतील दूध नेहमीच जीएसटीमुक्त आहे."पिशवीतील दूधाच्या दरात ३ ते ४ रुपयांपर्यंत कपात होऊ शकते, असे वृत्त होते. या पार्श्वभूमीवर अमूलने दूध विक्री दराबाबत खुलासा केला..Gokul Dairy Products: ‘गोकुळ’ आइस्क्रीम, बटर बाजारात आणणार.मेहता यांनी स्पष्ट केले की, पिशवीतील दुधाला नेहमीच जीएसटीमधून वगळण्यात आले आहे. नवीन कर रचनेनुसार देण्यात आलेली सवलत केवळ अल्ट्रा- हाय तापमान अर्थात यूएचटी दुधावर लागू होईल. यावरील जीएसटी दर ५ टक्क्यांवरून शून्यावर आणला आहे. यामुळे हे दूध आता स्वस्त होईल. आता यावर जीएसटी नसल्याने २२ सप्टेंबरपासून केवळ यूएचटी दूध दर कमी होतील, असे मेहता म्हणाले..गोकुळ दूध विक्री दरात बदल करणार का?कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’नेदेखील यावर भूमिका स्पष्ट केली आहे. जीएसटी सुधारणांमुळे गोकुळच्या विक्री दरात कोणताही बदल होणार नसल्याचे दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी म्हटले आहे. यूएचटी आणि तूप दरात येणाऱ्या काही दिवसात बदल होऊ शकतो. याचे दर कमी होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले. .यूएचटी प्रक्रिया म्हणजे काय?दुधातील यूएचटी (UHT) म्हणजे ही एक अल्ट्रा-हाय टेम्परेचर (अथवा अल्ट्रा हीट ट्रीटमेंट) प्रक्रिया आहे. या प्रक्रियेदरम्यान दूध काही सेकंदांसाठी किमान १३५ अंश सेल्सियस तापामानापर्यंत गरम केले जाते. यामुळे जवळपास सर्व सूक्ष्मजीव नष्ट होऊन दूध निर्जंतुक होते. असे दूध फ्रीजशिवाय अनेक महिने दीर्घकाळ टिकून राहते..वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)गोकुळचा सध्याचा दूध विक्री दर किती आहे?मुंबई, पुणे येथे म्हैस दूध विक्री दर प्रति लिटर ७४ रुपये आणि गाय दूध विक्री ५८ रुपये, कोल्हापूर कोकणात म्हैस दूध विक्री दर ६८ रुपये, गाय दूध दर ५२ रुपये.गोकुळ दूध खरेदी दर किती आहे?म्हैस दूध सरासरी ६०.४८ रुपये, गाय दूध सरासरी रु.३६.८४ (दरफरकासह).गोकुळ दूध संकलन किती आहे?एका दिवसातील कमाल दूध संकलन १८.५९ लाख लिटर एवढे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.