Agriculture GST: शेतकऱ्यांच्या उत्पादनाला ‘जीएसटी’चे संकट

Farmer Issue: शेतीसाठी लागणाऱ्या खते, बियाणे, कीटकनाशके आणि शेती औजारांवर लादण्यात आलेल्या जीएसटीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात १५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे जव्हार तालुक्यातील आदिवासी शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
Agriculture GST
Agriculture GSTAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: आदिवासी बहुल असलेल्या जव्हार तालुक्यातील नागरिकांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय आहे. निसर्गाचा ढासळणारा समतोल, खते, बी-बियाणे यांचे वाढणारे दर आणि या सगळ्यांवर केंद्र शासनाच्या माध्यमातून लादण्यात आलेला जीएसटी यामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात १५ टक्केपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे येथील आदिवासी शेतकरी मेटाकूटीला आला आहे.

पेरणी, शेतमाल विक्रीपर्यंत लागणाऱ्या वेगवेगळ्या करांमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. रासायनिक खते, कीटकनाशके, शेती औजार यांच्यासह इतर गोष्टीवर ५ ते २८ टक्क्यापर्यंत जीएसटी आकारला जात आहे. यामुळे हेक्टरी जवळपास १५ हजारांची वाढ झाली आहे. शेती व्यवसाय न परवडणारा झाला. त्यामुळे शेती संबंधीच्या वस्तूंना जीएसटीमुक्त करावे किंवा त्याचा परतावा शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशी मागणी होऊ लागली.

Agriculture GST
Agriculture GST: ‘जीएसटी’मुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांवर आर्थिक ताण !

शेतकऱ्यांना बाहेर काढा

काही दिवसांपूर्वी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही जीएसटीमुळे उत्पादन खर्चात वाढ होत असल्याची कबुली दिली होती. वास्तविक पाहता, व्यापाऱ्यांकडून वसूल केलेल्या जीएसटीचा परतावा शासनाकडून मिळतो, मात्र शेतकऱ्याकडून वसूल केलेला जीएसटी गंगाजळीला जमा होतो. यासाठी एकतर शेतकऱ्यांना जीएसटीच्या कक्षाबाहेर काढावे किंवा त्यांना परतावा द्यावा, अशी पण मागणी होऊ लागली.

Agriculture GST
GST Reduction on Agri Inputs : कृषी निविष्ठांवरील ‘जीएसटी’ माफ करा
उत्पादन खर्च कमी होऊन पिकाला आधारभाव मिळाल्याशिवाय शेती किफायतशीर होणे अशक्य आहे, शेतकऱ्यांची शेती जीएसटीमुक्त करण्यासाठी आगामी काळात शिवसेना लढा उभारणार आहे.
एकनाथ दरोडा, सरपंच
शेतीपूरक वस्तूवरील जीएसटी पूर्ण माफ केला तर शेतकरी थोडाफार फायद्यात येऊ शकतो, पण शासनाचे धोरण बघता एका हाताने घेणे व दुसऱ्या हाताने दामदुप्पट वसूल करणे असे काहीसे सुरू आहे.
दयानंद शेवाळे, प्रगतशील शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com